Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटीआर : घाई करा...या वर्षी मुदतवाढ नाही!

आयटीआर : घाई करा...या वर्षी मुदतवाढ नाही!

आयटीआर : केंद्रीय अर्थसचिव मल्होत्रा यांनी केले स्पष्ट, योग्य माहिती द्या; पुढचा त्रास टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 06:39 AM2023-07-17T06:39:43+5:302023-07-17T06:40:12+5:30

आयटीआर : केंद्रीय अर्थसचिव मल्होत्रा यांनी केले स्पष्ट, योग्य माहिती द्या; पुढचा त्रास टाळा

ITR : Hurry...no extension this year! | आयटीआर : घाई करा...या वर्षी मुदतवाढ नाही!

आयटीआर : घाई करा...या वर्षी मुदतवाढ नाही!

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जुलै महिन्यात आयकर विवरण भरण्यासाठी करदात्यांची लगबग सुरू असते. ३१ जुलैपर्यंत विवरण भरण्याची मुदत आहे. 
आतापर्यंत दरवर्षी मुदतवाढ मिळते. मात्र, यावेळी काेणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे केंद्रीय अर्थसचिव संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे. एका मुलाखतीत मल्होत्रा यांनी सांगितले, की यावेळी गेल्या वर्षीपेक्षा जास्त विवरणदाखल हाेतील, अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी ३१ जुलैपर्यंत ५.८३ लाख काेटी आयकर विवरणपत्रे दाखल करण्यात आले हाेते. लाेकांनी अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहू नये. त्यांनी लवकरात लवकर विवरण दाखल करावे आणि ऐनवेळची गडबड टाळावी. यावेळी मुदतवाढीची अपेक्षा ठेवू नये, असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. 

या कारणांमुळे आयकर परतावा मिळण्यास हाेताे विलंब

अर्धवट माहिती : विवरण दाखल करताना काही माहिती अर्धवट असेल तर विवरण स्वीकारले जात नाही. एकदा विवरण तपासून चूक दुरुस्त करू शकता.
कर थकबाकी  : आधी कर भरलेला असेल तरीही कदाचित तुम्हाला आणखी कर भरावा लागू शकताे. आकडेमाेड चुकू शकते. तसे झाल्यास आयकर विभागाकडून नाेटीस येऊ शकते. थकबाकी असेल तर ताे भरून सुधारित विवरण दाखल करावे. थकबाकी नसेल तर चूक तपासून रेक्टिफिकेशन रिटर्न भरावा.
बँक खात्याची चुकीची माहिती : विवरण भरताना बँक खात्यांची याेग्य माहिती द्यावी लागते. चुकीची माहिती दिल्यास परतावा तुमच्या खात्यात जमा हाेत नाही. अशा वेळी चूक दुरुस्त करून परतावा पुन्हा देण्याची रिक्वेस्ट द्यावी लागेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच सांगितले हाेते की, ७.२७ लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर काेणताही कर द्यावा लागणार नाही. नव्या कररचनेत आता स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा मिळेल. 
याबद्दल जाणून घेऊया.
७.२७ लाख
रुपयांच्या आत ज्यांचा वार्षिक पगार आहे, त्यांना कर द्यावा लागणार नाही.
३ लाख 
रुपयांपर्यंतचे उत्पन्न नव्या कररचनेत करमुक्त करण्यात आले आहे. जुन्या रचनेत २.५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त हाेते.

रिबेटमध्ये वाढ
सरकारने या वर्षी नव्या रचनेत रिबेटची मर्यादा वाढविली आहे. २५ हजार रुपयांच्या करावर रिबेट मिळेल. त्यामुळे सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर काेणतीही सवलत न घेता काहीच कर द्यावा लागणार नाही. 
स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ
यावेळी ५० हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन देण्यात आले आहे.नाेकरदार वर्ग आणि निवृत्तिवेतनधारकांना हा लाभ घेता येईल.
 

१२ टक्के वाढ जीएसटी संकलनात हाेईल, असा अंदाज आहे. २ काेटी विवरण आतापर्यंत दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी हा आकडा २० जुलै राेजी गाठला हाेता.

३३.६१ लाख
काेटी रुपये चालू आर्थिक वर्षात एकूण करसंकलनाची अपेक्षा आहे.

९.५६ लाख
काेटी रुपये केंद्राचे जीएसटी संकलन चालू आर्थिक वर्षात  हाेण्याचा अंदाज आहे.

Web Title: ITR : Hurry...no extension this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.