Lokmat Money > बिझनेस न्यूज > अ‍ॅपलंच ठरलं ! iPhone 12 सिरीजच्या बिग इव्हेंटची तारीख घोषित

अ‍ॅपलंच ठरलं ! iPhone 12 सिरीजच्या बिग इव्हेंटची तारीख घोषित

अ‍ॅपल पार्क आणि स्टीव्ह जॉब थेटरमध्ये या सिरीजचे वर्च्युअल स्वरुपात लाँचिंग होणार आहे. यासोबतच अ‍ॅपलचे दोन नवीन घड्याचाळे मॉडेल, एअर टॅग, न्यू आयपॅड आणि न्यू एअर पॉड्सही लाँच होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 11:03 PM2020-09-08T23:03:08+5:302020-09-08T23:04:05+5:30

अ‍ॅपल पार्क आणि स्टीव्ह जॉब थेटरमध्ये या सिरीजचे वर्च्युअल स्वरुपात लाँचिंग होणार आहे. यासोबतच अ‍ॅपलचे दोन नवीन घड्याचाळे मॉडेल, एअर टॅग, न्यू आयपॅड आणि न्यू एअर पॉड्सही लाँच होणार आहेत.

It's Apple! Announcing the launch date of the iPhone 12 series | अ‍ॅपलंच ठरलं ! iPhone 12 सिरीजच्या बिग इव्हेंटची तारीख घोषित

अ‍ॅपलंच ठरलं ! iPhone 12 सिरीजच्या बिग इव्हेंटची तारीख घोषित

डिजिटल क्षेत्रातील नामवंत आणि मोबाईलचे जगप्रसिद्ध ब्रँड बनवणारी कॅलिफोर्नियाची कंपनी अ‍ॅपल लवकरच iPhone 12 चे काही मॉडेल लाँच करणार आहे. पुढील 7 दिवसांत आपण अ‍ॅपलचे हे नवं रुप पाहू शकणार आहात, असे ग्रेग जोस्वीक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरु म्हटलंय. अॅपलकडून iPhone 12 च्या लाँचिंगची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार 15 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजता हा मोबाईल ऑनलाईन इव्हेंटद्वारे लाँच होणार आहे. 

अ‍ॅपल पार्क आणि स्टीव्ह जॉब थेटरमध्ये या सिरीजचे वर्च्युअल स्वरुपात लाँचिंग होणार आहे. यासोबतच अ‍ॅपलचे दोन नवीन घड्याचाळे मॉडेल, एअर टॅग, न्यू आयपॅड आणि न्यू एअर पॉड्सही लाँच होणार आहेत. iPhone Pro हा 2020 मधील सर्वात महागडा फोन ठरणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे अ‍ॅपल या फोनमध्ये चक्क सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. डिस्प्ले सप्लाय चेन कंसल्टंट (DSCC) ने त्यांच्या अहवालात सांगितले की, iPhone 12 सिरीजमध्ये चार मॉडेल लाँच केले जाणार आहेत. आयफोन 12, आयफोन 12 मॅक्स, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स असे हे फोन असणार आहेत. हे फोन यंदाच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये लाँच केले जातील. या अहवालानुसार यापैकी तीन फोनमध्ये सॅमसंगचा डिस्प्ले वापरला जाणार आहे. आयफोन 12 मध्ये 5.4 इंचाची स्क्रीन दिली जाणार आहे. हा डिस्प्ले सॅमसंगचा ओएलईडी डिस्प्ले असणार आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2340 x 1080 पिक्सल असणार आहे. 

आयफोन १२ प्रोमध्ये ६.१ इंचाचा सॅमसंगचाच OLED डिस्प्ले असणार आहे. याचे रिझॉल्यूशन 2532 x 1170 पिक्सल असेल. तर याच सिरीजच्या आयफोन १२ प्रो मॅक्समध्ये 6.68 इंचाचा सॅमसंगचा फ्लेक्सिबल OLED पॅनेल असण्याची शक्यता आहे. याचे रिझोल्युशन 2778 x 1284 पिक्सल असेल. 

किंंमत किती?
आयफोन १२ मध्ये ४४०० एमएएचची बॅटरी देण्यात येण्याची शक्यता आहे. ही बॅटरी अ‍ॅपलची आतापर्यंतची सर्वात जास्त क्षमतेची बॅटरी असेल. तर आयफोन १२ चा बेस व्हेरिअंट आयफोन ११ पेक्षाही स्वस्त असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्टमध्ये आयफोन १२ सीरीजची किंमत ६०० ते ७०० डॉलर असू शकते.
 

Web Title: It's Apple! Announcing the launch date of the iPhone 12 series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.