Join us  

हिंडेनबर्ग बाॅम्बने अब्जावधी ‘भस्म’, जॅक डाॅर्सी यांना बसला माेठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 5:16 AM

हिंडेनबर्गने कंपनीबाबत सादर केलेल्या अहवालातून कंपनीने ग्राहक आणि सरकारची फसवणूक केल्याचा आराेप केला.

वाॅशिंग्टन : अमेरिकेतील शाॅर्टसेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहानंतर आता ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डाॅर्सी यांच्या ‘ब्लाॅक इंक’ या कंपनीला लक्ष्य केले.

हिंडेनबर्गने कंपनीबाबत सादर केलेल्या अहवालातून कंपनीने ग्राहक आणि सरकारची फसवणूक केल्याचा आराेप केला. त्यानंत ‘ब्लाॅक’चे शेअर्स काेसळले असून, डाॅर्सी यांना ४.३ हजार काेटी रुपयांचा फटका बसला. सुमारे दाेन वर्षांच्या तपासानंतर हा अहवाल सादर केला आहे. त्यात म्हटले आहे, की काेराेना महामारीदरम्यान कंपनीने घाेटाळा केला. त्यामुळे शेअर्सच्या किमतीत अचानक माेठी वाढ दिसून आली. ही वाढ संशयास्पद हाेती. 

अशी केली फसवणूक ब्लाॅक इंकने ज्या लाेकांची मदत केल्याचा दावा केला आहे, त्यांचा गैरफायदा घेतला आहे. यूझर्सची संख्यादेखील जास्त दाखविली.  बनावट खात्यांद्वारे सक्रीय युझर्स जास्त असल्याचे वाढविले. 

हे आहेत प्रमुख आराेप- कॅश ॲपचा सेक्स ट्रॅफिकिंगसाठी वापर झाला. त्यात अल्पवयीनांचाही समावेश हाेता.- इनसायडर ट्रेडिंगद्वारे डाॅर्सी यांच्यासह टाॅप मॅनेजमेंट सदस्यांनी १ अब्ज डाॅलर्सचे शेअर्स उच्च किमतीत विकून भरघाेस कमाई केली.- यूझर्सची संख्या वाढवून दाखविली.

२००९ मध्ये ‘ब्लाॅक’ची स्थापना केली. कंपनी पेमेंट व माेबाइल बॅंकिंग सेवा पुरविते. कंपनीचे भांडवली मूल्य ४४ अब्ज डाॅलर्स एवढे आहे. 

१५% घसरले शेअर्स हिंडेनबर्गच्या अहवालानंतर ब्लाॅक इंकचे शेअर्स १५ टक्क्यांनी घसरले. काही दिवसांमध्ये हे शेअर्स ६५ ते ७५ टक्क्यांपर्यंत घसरू शकतात. जॅक डाॅर्सी यांच्या संपत्तीत माेठी घसरण झाली. त्यांची संपत्ती एकाच दिवसात ५२.६ काेटी डाॅलर्सने घसरून ४.४ अब्ज डाॅलर्स एवढी राहली आहे.

मस्क, ट्रम्प यांच्या नावाने बनावट खातीकंपनीच्या ‘कॅश’ या ॲपवर टेस्लाचे मालक इलाॅन मस्क यांच्या नावाने डझनभर बनावट खाती दिसली. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्याही नावाने अनेक बनावट खाती उघडण्यात आली हाेती.

भारतीय वंशाच्या अमृता आहुजा यांच्यावरही आराेपहिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशाच्या अमृता आहुजा यांच्यावरही आराेप करण्यात आले आहेत. त्या ‘ब्लाॅक’च्या प्रमुख वित्तीय अधिकारी आहेत. त्यांनी लाखाे डाॅलर्सचा घाेटाळा केल्याचे अहवालात म्हटले आहे. त्या गेल्या ४ वर्षांपासून कंपनीत कार्यरत आहेत. 

सरकारची फसवणूक करणाऱ्यांची केली मदतहिंडेनबर्गच्या दाव्यानुसार, काेराेनाकाळात फसवणूक करून सरकारी याेजनांचा गैरफायदा घेणाऱ्यांची ‘ब्लाॅक’ने मदत केली. ‘कॅश’ ॲपद्वारे अनेक लाेकांना एकाच खात्यात सरकारकडून मदत म्हणून मिळणारी रक्कम जमा हाेऊ दिली.

अदानी समूहावर केले हाेते आराेपहिंडेनबर्गने २४ जानेवारीला अदानी समूहाविराेधात अहवाल सादर केला हाेता. त्यातून शेअर्सचे मॅनिप्युलेशन व घाेटाळ्याचा आराेप केला हाेता. त्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स सुमारे ७० टक्क्यांनी घसरले हाेते.

टॅग्स :व्यवसाय