Jaguar New Logo: प्रत्येक कारवेड्या व्यक्तीला जॅग्वार कंपनीची गाडी आपल्या पार्किंगमध्ये असावी असं स्वप्न असतं. या कंपनीच्या लक्झरी कार जगभरात प्रसिद्ध आहेत. तुम्हीही जर जॅग्वार कारचे चाहते असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. ब्रिटीश लक्झरी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जॅग्वारने आपल्या जुन्या लोगोत बदल केला आहे. जग्वार कंपनी ही खूप जुनी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने गेल्या ८९ वर्षांपासून अनेक प्रकारच्या कार बाजारात आणल्या आहेत. आता कंपनीने आपले संपूर्ण लक्ष इलेक्ट्रिक कारवर केंद्रित केले आहे. जग्वार ३ डिसेंबर रोजी मियामी आर्ट वीकमध्ये आपले नवीन इलेक्ट्रिक कारचे मॉडेल जगासमोर सादर करणार आहेत. यामुळे कंपनीने आपला जुना लोगो बदलून नवीन लोगो लाँच केला आहे. दरम्यान, या नवीन लोगोवर टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जग्वारचा नवीन लोगो कसा आहे?
जग्वारच्या नवीन लोगोमध्ये अखंडपणे अप्पर आणि लोअरकेस वर्णांचा समावेश आहे. यामध्ये G आणि U मोठ्या अक्षरात आहेत. सर्व कॅरेक्टर्सची रचना सोनेरी रंगात करण्यात आली आहे. जंपिंग कॅट लोगोला ब्रास एम्बॉस्ड अपडेट देखील मिळत आहे. याशिवाय, मार्केटिंग स्लोगनमध्ये “डिलीट ऑर्डिनरी”, “लाइव्ह व्हिव्हिड” आणि “कॉपी नथिंग” सारख्या टॅगलाईनचा समावेश आहे.
जॅग्वारचे एमडी रॉडन ग्लोव्हर म्हणाले की, नवीन कार जाणूनबुजून विक्रीतून काढून टाकण्यात आल्या. कारण जुन्या मॉडेल्स आणि नवीन लूक असलेल्या जॅग्वार यांच्यात अडथळा दिसेल असं मत आहे.
Copy nothing. #Jaguarpic.twitter.com/BfVhc3l09B
— Jaguar (@Jaguar) November 19, 2024
इलॉन मस्क यांची जॅग्वारच्या नवीन लोगोवर प्रतिक्रिया
इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते कायम नवनवीन गोष्टींवर प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात. जग्वारच्या नवीन लोगोच्या लॉन्चवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील नवीन लोगोला प्रतिसाद देत इलॉन मस्क यांनी लिहिलंय, की "तुम्ही कार विकता का?" (तुम्ही गाड्या विकता का?) इलॉन मस्कच्या या प्रश्नाला उत्तर देताना जग्वारने लिहिले की, "होय, आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो, २ डिसेंबर रोजी मियामीमध्ये एक कप चहा आमच्यासोबत घेण्यासाठी सहभागी व्हा."