Lokmat Money > बिझनेस न्यूज > जैन इरिगेशन अमेरिकेतील कंपन्यांचे अधिग्रहण करणार

जैन इरिगेशन अमेरिकेतील कंपन्यांचे अधिग्रहण करणार

जैन इरिगेशन सिस्टिम्स ही कंपनी अमेरिकेतील २ कंपन्यांमधील ८0 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. त्यासाठी ४.८ कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

By admin | Published: April 20, 2017 01:12 AM2017-04-20T01:12:17+5:302017-04-20T01:12:17+5:30

जैन इरिगेशन सिस्टिम्स ही कंपनी अमेरिकेतील २ कंपन्यांमधील ८0 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. त्यासाठी ४.८ कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

Jain Irrigation will acquire American companies | जैन इरिगेशन अमेरिकेतील कंपन्यांचे अधिग्रहण करणार

जैन इरिगेशन अमेरिकेतील कंपन्यांचे अधिग्रहण करणार

मुंबई : जैन इरिगेशन सिस्टिम्स ही कंपनी अमेरिकेतील २ कंपन्यांमधील ८0 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. त्यासाठी ४.८ कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
जैन इरिगेशनने मुंबई शेअर बाजारास ही माहिती दिली आहे. त्यानुसार, अ‍ॅग्री व्हली इरिगेशन आयएनसी आणि इरिगेशन डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन आयएनसी या कंपन्यांचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. या कंपन्यांतील ८0 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या वितरण कंपनीत या कंपन्यांची मालकी विलीन करण्यात येईल. नवी कंपनी शेतकऱ्यांना सिंचन तंत्रज्ञान पुरविण्याचे काम करील. या दोन्ही कंपन्या अमेरिकेत दीर्घकाळपासून काम करीत आहेत.
जैन इरिगेशन सिस्टिम्सचे सीईओ अनिल जैन यांनी सांगितले की, या अधिग्रहणासाठी आम्ही ४८ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. नव्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही आमची जागतिक दर्जाची उत्पादने वितरीत करू शकू.

Web Title: Jain Irrigation will acquire American companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.