नवी दिल्ली : जनधन, आधार आणि मोबाइलमुळे (जॅम) सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली आहे, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. यामुळे सर्व भारतीय समान आर्थिक आणि डिजिटल क्षेत्रात आले आहेत. जीएसटीमुळे जशी संयुक्त बाजारपेठ झाली त्याप्रमाणे या क्षेत्रातही होत आहे, असेही ते म्हणाले.
जेटली म्हणाले की, देशाचे लक्ष आता एक अब्जाकडे आहे. एक अब्ज आधार नंबर आता एक अब्ज बँक खात्याशी आणि एक अब्ज मोबाइल फोनशी जोडले जाणार आहेत. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण देश आर्थिक आणि डिजिटल मुख्य प्रवाहात येणार आहे.
प्रधानमंत्री जनधन योजनेला तीन वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्त त्यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ज्याप्रमाणे जीएसटीमुळे एक कर, एक बाजार, एक भारत झाला आहे; त्याप्रमाणे पीएमजेडीवाय आणि जॅम क्रांतीतून संपूर्ण भारतीयांना एका समान आर्थिक आणि डिजिटल क्षेत्राशी जोडले जाणार आहे. कोणीही भारतीय या मुख्य धारेतून बाहेर असणार नाही.
हे पाऊल एखाद्या सामाजिक क्रांतीपेक्षा कमी नाही. यामुळे
सरकार, अर्थव्यवस्था आणि
विशेषत: गरिबांना अधिक फायदा होणार आहे.
जेटली म्हणाले की, या सुधारणांमुळे गरिबांना आर्थिक सेवा मिळतील, तर सबसिडीचे ओझे कमी झाल्याने सरकारची आर्थिक स्थिती सुधारेल. सध्या सरकार ३५ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यावर वार्षिक ७४ हजार कोटी रुपये जमा करते. म्हणजेच दर महिन्याला साधारणत: सहा हजार कोटी रुपये स्थानांतरित केले जातात. सरकारच्या विविध योजना मनरेगा, वृद्धावस्था पेन्शन आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती यांचा यात समावेश आहे.
ंआधार जोडणीची प्रक्रिया जोरात...
आधारला बँक खात्याशी जोडण्याबाबत जेटली यांनी सांगितले की, आतापर्यंत ५२.६२ कोटी खाती जोडण्यात आली आहेत. त्यामुळे गरीब नागरिकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पेमेंट करण्यात येत आहे.
दर महिन्याला गरिबांकडून आधार ओळखपत्राच्या आधारे ७ कोटी यशस्वी पेमेंट करण्यात येत आहेत. याशिवाय भीम अॅप व यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सुरू झाल्यामुळे जॅम पूर्णपणे कार्यरत झाले आहे.
भारतात आता जनधन, आधार आणि मोबाइलमुळे क्रांती, जेटली यांचे मत
जनधन, आधार आणि मोबाइलमुळे (जॅम) सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली आहे, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 02:56 AM2017-08-28T02:56:20+5:302017-08-28T02:56:47+5:30