Lokmat Money > बिझनेस न्यूज > जम्मू-काश्मीरला जाताय, टेन्शन कसलं? आता Uber वरुन 'शिकारा'ही बुक करता येणार; पाहा डिटेल्स 

जम्मू-काश्मीरला जाताय, टेन्शन कसलं? आता Uber वरुन 'शिकारा'ही बुक करता येणार; पाहा डिटेल्स 

Uber Shikara Service : टॅक्सी सेवा पुरवणारी कंपनी उबरचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. उबर ही अतिशय लोकप्रिय कंपनी आहे. आता या कंपनीनं जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी नवी सेवा सुरू केलीये.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 01:55 PM2024-12-02T13:55:09+5:302024-12-02T13:55:33+5:30

Uber Shikara Service : टॅक्सी सेवा पुरवणारी कंपनी उबरचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. उबर ही अतिशय लोकप्रिय कंपनी आहे. आता या कंपनीनं जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी नवी सेवा सुरू केलीये.

Jammu and Kashmir tourism no tensio Shikara can also be booked on Uber See details how to book | जम्मू-काश्मीरला जाताय, टेन्शन कसलं? आता Uber वरुन 'शिकारा'ही बुक करता येणार; पाहा डिटेल्स 

जम्मू-काश्मीरला जाताय, टेन्शन कसलं? आता Uber वरुन 'शिकारा'ही बुक करता येणार; पाहा डिटेल्स 

Uber Shikara Service : टॅक्सी सेवा पुरवणारी कंपनी उबरचं (Uber) नाव तुम्ही ऐकलं असेलच. उबर ही अतिशय लोकप्रिय कंपनी आहे, जी लोकांना ऑनलाइन टॅक्सी बुक करण्याची सेवा देते. आतापर्यंत उबर आपल्या ग्राहकांना टॅक्सीची सुविधा देत होती, पण आता उबरनं आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. उबरनं जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील डल लेकमध्ये पर्यटकांसाठी खास सेवा सुरू केली आहे. जाणून घेऊया उबरच्या या नव्या सेवेबद्दल.

उबरनं सुरू केली शिकारा सेवा

श्रीनगरच्या डल लेकमध्ये जलवाहतूक सेवा देण्यासाठी उबरनं नवी सेवा सुरू केली आहे. या सेवेत उबर आता डल लेकमधील लोकांना शिकारा पुरवणार आहे. सोमवारपासून ही सेवा सुरू झाली असून, त्याअंतर्गत या डल लेकला भेट देणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही त्रासाशिवाय शिकारा बुक करता येणार आहे. शिकारा बुक करण्यासाठी लोकांना प्री-बुकिंगचा पर्यायही मिळेल.

शिकारा १ तासासाठी बुक करता येईल

उबरच्या नव्या सेवेत लोकांना शिकारा १३ तास अगोदर किंवा १५ दिवस अगोदर बुक करता येऊ शकते. एका शिकारात केवळ ४ जण या ठिकाणी भेट देऊ शकतात. याशिवाय शिकारा फक्त १ तासासाठी बुक केली जाणार आहे. उबर या नव्या सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही. सगळे पैसे ज्यांची शिकारा आहे त्यांनाच मिळतील. उबरच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये काम करणाऱ्या पर्यटन कामगारांना आर्थिक आधार मिळणार आहे.

कशी बुक कराल?

उबरसह आपली शिकारा बुक करणं सोपं आहे. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून उबर अॅप अपडेट किंवा इन्स्टॉल करावं लागेल. आता पिकअप पॉईंट म्हणून 'शिकारा घाट नंबर १६' निवडा आणि ड्रॉप पॉईंटही निवडा. उबर हंटवर क्लिक करा. वेळ आणि तारीख निवडा. बुक ऑप्शनवर क्लिक करा आणि आपलं बुकिंग करा.

Web Title: Jammu and Kashmir tourism no tensio Shikara can also be booked on Uber See details how to book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.