Lokmat Money > बिझनेस न्यूज > PMJDY Account : जनधन खातेधारकांसाठी खूशखबर! खात्यात बॅलन्स नसतानाही घेऊ शकता 10 हजार रुपयांचा लाभ; जाणून घ्या, सविस्तर...

PMJDY Account : जनधन खातेधारकांसाठी खूशखबर! खात्यात बॅलन्स नसतानाही घेऊ शकता 10 हजार रुपयांचा लाभ; जाणून घ्या, सविस्तर...

PMJDY Account : केंद्र सरकार प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojna) अंतर्गत झिरो बॅलन्स सेव्हिंग खाते उघडते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 03:24 PM2021-12-22T15:24:18+5:302021-12-22T15:25:28+5:30

PMJDY Account : केंद्र सरकार प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojna) अंतर्गत झिरो बॅलन्स सेव्हिंग खाते उघडते.

Jandhan account holders withdrawing 10000 rupees without minimum balance know how  | PMJDY Account : जनधन खातेधारकांसाठी खूशखबर! खात्यात बॅलन्स नसतानाही घेऊ शकता 10 हजार रुपयांचा लाभ; जाणून घ्या, सविस्तर...

PMJDY Account : जनधन खातेधारकांसाठी खूशखबर! खात्यात बॅलन्स नसतानाही घेऊ शकता 10 हजार रुपयांचा लाभ; जाणून घ्या, सविस्तर...

नवी दिल्ली : जर तुमचेही जनधन खाते (Jandhan Account) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. याशिवाय, जनधन योजना खात्यात अनेक सुविधाही मिळतात. दरम्यान, केंद्र सरकार प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojna) अंतर्गत झिरो बॅलन्स सेव्हिंग खाते उघडते. यामध्ये अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेकबुकसह इतर अनेक फायदेही मिळतात.

कसे मिळतील 10 हजार रुपये?
प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत, तुमच्या खात्यात बॅलन्स नसला तरीही, 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. पूर्वी ही रक्कम 5 हजार रुपये होती. सरकारने ती आता 10 हजारांपर्यंत वाढवली आहे.

काय आहे नियम?
प्रधानमंत्री जनधन खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान 6 महिने जुने असावे. तसे नसल्यास, तुम्हाला फक्त 2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे.

काय आहे जनधन खाते?
पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) हा सर्वात महत्वाकांक्षी वित्तीय प्रोग्राम आहे, जो बँकिंग / बचत आणि ठेवी खाती, पैसे, कर्ज, विमा, निवृत्तीवेतनपर्यंत प्रवेश सुनिश्चित करतो. हे खाते कोणत्याही बँक शाखा किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटवर उघडता येते. पीएमजेडीवाय खाते शून्य शिल्लक ठेवून उघडले जात आहे.

कसे उघडावे खाते?
तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत जा. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल. 

याचबरोबर, PMJDY च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाउंट उघडू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय 10 वर्षांपेक्षा अधिक आहे ते जन धन खाते उघडू शकतो.

Web Title: Jandhan account holders withdrawing 10000 rupees without minimum balance know how 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.