Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ जानेवारीपासून UPI पेमेंटमध्ये होणार मोठा बदल, पेमेंट अ‍ॅपच्या ग्राहकांवर होणार असा परिणाम

१ जानेवारीपासून UPI पेमेंटमध्ये होणार मोठा बदल, पेमेंट अ‍ॅपच्या ग्राहकांवर होणार असा परिणाम

UPI payments News : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI  पेमेंट सर्व्हिसबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

By बाळकृष्ण परब | Published: November 30, 2020 02:22 PM2020-11-30T14:22:38+5:302020-11-30T14:25:30+5:30

UPI payments News : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI  पेमेंट सर्व्हिसबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

From January 1, there will be a big change in UPI payments, which will affect the customers of the payment app | १ जानेवारीपासून UPI पेमेंटमध्ये होणार मोठा बदल, पेमेंट अ‍ॅपच्या ग्राहकांवर होणार असा परिणाम

१ जानेवारीपासून UPI पेमेंटमध्ये होणार मोठा बदल, पेमेंट अ‍ॅपच्या ग्राहकांवर होणार असा परिणाम

HighlightsUPI  पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार मात्र या नियमाचा परिणाम पेटीएमच्या ग्राहकांवर होणार नाही

नवी दिल्ली - नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI  पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे. मात्र या नियमाचा परिणाम पेटीएमच्या ग्राहकांवर होणार नाही.

या निर्णयाबाबत एनपीसीआयने सांगितले की, थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सवर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीसीआये हा निर्णय भविष्यात कुठल्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची एकाधिकारशाही रोखण्यासाठी आणि त्याला आकाराच्या मनाने मिळणारे विशेष फायदे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. एसपीसीआयच्या या निर्णयामुळे आता UPI ट्रांझॅक्शनमध्ये आता कुठल्याही पेंमेंट अ‍ॅपची एकाधिकारशाही राहणार नाही. ३० टक्के कॅप निर्धारित करण्यात आल्याने आता गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोनपे सारख्या कंपन्या यूपीआयअंतर्गत होणाऱ्या एकूण ट्रान्झॅक्शनमध्ये कमाल ३० टक्के ट्रान्झॅक्शनचीच तरतूद करू शकतील.


एनपीसीआयच्या एका पावलामुळे पेटीएमच्या यूपीआय पेमेंट सेवांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पेमेंट्स बँकेचे लायसन्स असल्यामुळे ३० टक्के कॅपची मर्यादा पेटीएमला लागू होणार नाही. हे अ‍ॅप थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या श्रेणीत येत नाही.

यूनिफाइड पेमेंट इंटरफेस/UPI एक रियल टाइम पेमेंट सिस्टिम आहे. ती मोबाईल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पैसे अकाऊंटमध्ये त्वरित ट्रान्सफर करू शकते. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँकेच्या अकाऊंटमधून त्वरित ट्रान्सफर करू शकता. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँक अकाऊंटला अनेक यूपीआय अ‍ॅपशी लिंक करू शकता. तर अनेक बँक अकाऊंटना एका यूपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून नियंत्रित करू शकता.

Web Title: From January 1, there will be a big change in UPI payments, which will affect the customers of the payment app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.