Lokmat Money > बिझनेस न्यूज > जपान आर्थिक संकटात, जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेची जागा गमावली; भारताला मोठी संधी

जपान आर्थिक संकटात, जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेची जागा गमावली; भारताला मोठी संधी

जपानच्या जीडीपीमध्ये सगल दोन तिमाहीत मोठी घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 02:29 PM2024-02-15T14:29:47+5:302024-02-15T14:32:11+5:30

जपानच्या जीडीपीमध्ये सगल दोन तिमाहीत मोठी घसरण झाली आहे.

Japan lost its place as the world's third economy in the financial crisis; Big opportunity for India | जपान आर्थिक संकटात, जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेची जागा गमावली; भारताला मोठी संधी

जपान आर्थिक संकटात, जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेची जागा गमावली; भारताला मोठी संधी

जगभरातील अनेक देश आर्थिक मंदीत सापडले आहेत. यात जपानसह युकेचाही समावेश आहे. सलग दोन तिमाहीत जीडीपीमध्ये झालेल्या घसरणीने जपानने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्थेची जागा गमावली आहे. आता जर्मनी ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. जपानचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीत वार्षिक ०.४% घसरले. 

'आठवड्यातून ३ दिवस ऑफिसला या, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा,' TCS नंतर आणखी एका दिग्गज कंपनीचा इशारा 

सरकारी आकडेवारीनुसार २०२३ साठी जपानचा डॉलरच्या दृष्टीने नाममात्र GDP ४.२ ट्रिलियन डॉलर होता. तुलनेत, जर्मनी ४.५ ट्रिलियन डॉलरच्या GDP सह जागतिक स्तरावर तिसरे स्थान मिळवले. क्रमवारीतील हा बदल विशेषतः येनच्या मूल्यातील घसरणीमुळे झाला आहे, जे २०२२ आणि २०२३ मध्ये डॉलरच्या तुलनेत १८ टक्क्यांहून अधिक घसरले. यात गेल्या वर्षीच्या सात टक्क्यांच्या घसरणीचाही समावेश आहे. बँक ऑफ जपानने नकारात्मक व्याजदर कायम ठेवण्याचा घेतलेला निर्णयही चलनाच्या घसरणीला कारणीभूत ठरला.

जपान आणि जर्मनी हे दोन्ही देश मोठ्या प्रमाणावर निर्यातीवर अवलंबून आहेत आणि त्यांना महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करावा लागतो, असे एएफपी अहवालात म्हटले आहे. जपानमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे, जो घटत्या लोकसंख्येमुळे आणि कमी जन्मदरामुळे वाढला आहे. दुसरीकडे, जर्मनीलाही कामगार टंचाई, युरोपियन सेंट्रल बँकेच्या धोरणात बदल आणि कामगारांची कमतरता यांचा सामना करावा लागत आहे.

घटती लोकसंख्या आणि कमी जन्मदराचा सामना करत जपानची अर्थव्यवस्था २०२३ च्या शेवटच्या तिमाहीत ०.१ टक्क्यांनी घसरली आहे. १९६० च्या उत्तरार्धात जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यापासून चौथ्या स्थानावर घसरण्यापर्यंतचा जपानचा प्रवास एक गुंतागुंतीचा आर्थिक इतिहास सांगतो.

भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकेल 

तरुणांची वाढती लोकसंख्या आणि उच्च विकास दरामुळे भारत या दशकाच्या अखेरीस जपान आणि जर्मनी या दोघांनाही मागे टाकेल, युनायटेड स्टेट्स आणि चीननंतर जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये तिसरे स्थान मिळवेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज आहे की भारताची अर्थव्यवस्था २०२६ मध्ये जपान आणि २०२७ मध्ये जर्मनीला मागे टाकेल.

Web Title: Japan lost its place as the world's third economy in the financial crisis; Big opportunity for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.