Human Washing Machine :तंत्रज्ञानाने मनुष्याची अनेक कामे सोपी केली. जेवण तयार करण्यापासून कपडे धुण्यापर्यंत अनेक गोष्टी एका बटणावर होत आहेत. आता तर एक अशी मशीन बाजारात आली आहे, जी कपड्यांप्रमाणे माणसालाच धुते. होय, तुम्ही बरोबर वाचलत. हे वॉशिंग मशीन मानवी शरीर पाण्याने धुवून ते फक्त १५ मिनिटांत कोरडे करेल. या प्रक्रियेनंतर तुमचे शरीर पूर्णपणे कपड्यांसारखे नवीन होईल. तुमचा अजूनही विश्वास बसत नसेल ना? चला मग आणखी जाणून घेऊ.
जपानी अभियंत्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (artificial intelligence) मदतीने भविष्यकालीन वॉशिंग मशीन तयार केले आहे. याला मिराई निंगेन सेंटाकुकी (Mirai Ningen Sentakuki) असे नाव देण्यात आले आहे. जे मानवी शरीराचे विश्लेषण करुन धुवून कोरडे करते. हे उपकरण जपानच्या सायन्स को कंपनीने विकसित केले आहे. कंपनीने बनवले आहे. हे मशीन ओसाका येथील एक्स्पोमध्ये सादर करण्यात आले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ते लवकरच १,००० लोकांवर चाचणीसाठी सादर केले जाईल.
अवघ्या १५ मिनिटांत आंघोळ पूर्ण
कंपनीचा दावा आहे की हे उपकरण केवळ १५ मिनिटांत आपले काम पूर्ण करते. त्याचे संपूर्ण कार्य अगदी वॉशिंग मशीनसारखे आहे. प्रथम यात शरीर धुतले जाते आणि नंतर ते कोरडे केले जाते. कोरडे म्हणजे शरीराला पूर्णपणे चकाचक करते. हे यंत्र हुबेहूब फायटर जेटच्या कॉकपिटसारखे दिसते. परंतु, याचे काम पाण्याने धुवून कोरडे करणे आहे.
कसे काम करते?
या यंत्राच्या आतील मशीन्स शरीर धुण्यासाठी पाण्याचे जेट्स आणि सूक्ष्म बबल्स वापरतात. याद्वारे, शरीराची संपूर्ण साफसफाई केली जाते. यात स्पासारखा अनुभव मिळतो. प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेच्या आणि शारीरिक गरजांनुसार मशीन वॉशमध्ये बसवलेले AI सेन्सर, तापमान आणि दाब देखील त्यानुसार सेट केले जातात. या यंत्राला तुमचा मूडही कळतो. त्यामुळेही त्याचाही यात खुबीने वापर होतो.
आरामदायी अनुभव
या मशीनमध्ये आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला आरामदायी अनुभव येईल. यात शरीराला एक प्रकारे मसाज मिळत असल्याने थकवा दूर होतो. मशीनमधून बाहेर आल्यानंतर उत्साही वाटू लागते, असा दावा कंपनीने केला आहे.