टोकियो - जपानची कंपनी सुझुकी मोटर्स ( 7269.T) इलेक्ट्रिक वाहन व बॅटरीच्या उत्पादनासाठी भारतात जवळपास 150 बिलियन येन म्हणजेच 126 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या विचारात आहेत. जपानच्या काही मीडियाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा हे शनिवारी भारत भेटीवर आले होते आणि यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुझुकीची गुंतवणुक ही किशिदा यांनी भारत भेटीदरम्यान पुढील पाच वर्षांसाठी केलेल्या 5 ट्रिलियन येनच्या ( ३.२० लाख कोटींची) गुंतवणुकीचा भाग असल्याचे Nikkei business या वृत्तपत्राने म्हटले आहे.
भारतात नवीन इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन घेण्याचा निर्णय सुझुकीने घेतला आहे आणि त्यांनी 2025 आधी हा प्रकल्प सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सुझुकी मोटरच्या प्रवक्त्यांनी मात्र या वृत्तावर कोणतेही भाष्य करण्यास टाळले आहे.