क्लासिक लेजंड्स (Classic Legends) बाईक कंपनीनं भारतात Jawa, Jawa Forty Two आणि Jawa Perak च्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही व्हेरिअंट्सच्या किंमती वाढल्या आहे. कंपनीनं बाईक्सच्या किंमतीत २,९८७ रूपयांपर्यंतची वाढ केली आहे. जावा मोटरसायकल्समध्ये व्हिज्युअली आणि मेकॅनिकली कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
Jawa च्या सिंगल चॅनल एबीएस मॉडेलच्या ब्लॅक आणि ग्रे कलर ऑप्शन व्हेरिअंटची किंमत वाढून १ लाख ७६ हजार १५१ रुपये झाली आहे. यापूर्वी ही किंमत १ लाख ७३ हजार १६४ रुपये इतकी होती. तर मरून कलरच्या व्हेरिअंटची किंमत १ लाख ७७ हजार २१५ रुपये इतकी झाली असून यापूर्वी या बाईकची किंमत १ लाख ७४ हजार २२८ रूपये होती. Jawa बाईकच्या ड्युअल चॅनल एबीएस मॉडेलची किंमत वाढून आता १ लाख ८५ हजार ०९३ रुपये इतकी झाली आहे. यापूर्वी या बाईकची किंमत १ लाख ८२ हजार १०६ रुपये इतकी होती. तर दुसरीकडे मरून रंगाच्या बाईकची किंमत १ लाख ८३ हजार १७० रुपयांवरून वाढून १ लाख ८६ हजार १५७ रुपये इतकी झाली आहे.
Jawa Forty Two सिंगल चॅनल एबीएस मॉडेलमधील टील आणि स्टारलाईट ब्लू कलर ऑप्शन्स मॉडेलची किंमत १ लाख ६० हजार ३०० रुपयांवरून वाढून १ लाख ६३ हजार २८७ रुपये इतकी झाली आहे. ल्यूमस लाईम शेडची किंमत १ लाख ६४ हजार १६४ रुपयांवरून वाढून १ लाख ६७ हजार १५१ रुपये इतकी झाली. तर कॉमेट रेड, गॅलेक्टिक ग्रीन आणि नेब्युला ब्लू रंगाच्या बाईकची किंमत आता १ लाख ६८ हजार २१५ रुपये झाली.
Jawa Perak
Jawa Perak ही बाईक सिंगल व्हेरिअंट आणि सिंगल कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत आता १ लाख ९४ हजार ५०० रुपयांवरून वाढून १ लाख ९७ हजार ४८७ रुपये इतकी झाली आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम दिल्लीच्या आहेत.