न्यू यॉर्क : अमेरिकेतील ६० अत्यंत श्रीमंत महिलांच्या फोर्ब्जच्या यादीत भारतीय वंशाच्या जयश्री उल्लाल (५७) आणि नीरजा सेठी (६३) यांनी स्थान पटकावले आहे. स्वत:च्या कष्टांनी श्रीमंत बनलेल्या महिलांची ही यादी आहे. या यादीत सगळ्यात वर रिअॅलिटी टीव्ही कलाकार आणि जोखीम घेऊन उद्योग सुरू केलेली अवघ्या २१ वर्षांची कायली जेन्नर हिने स्थान मिळवले आहे.
यादीत जयश्री उल्लाल यांनी १८वे स्थान मिळविले असून त्यांची संपत्ती १.३ अब्ज डॉलर आहे तर २१व्या स्थानावरील सेठी यांची संपत्ती एक अब्ज डॉलर आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ महिला उद्योजकांनी सगळे अडथळे मोडून काढून नवी उंची गाठली आहे. त्यांनी जेनेटिक टेस्टिंगपासून ते अवकाशापर्यंतच्या विषयांत कंपन्या स्थापन केल्या आणि भविष्य घडवले. स्वत:ला घडवलेल्या या स्टार्टर्सनी त्यांनी निर्माण केलेले ब्रँड्स लोकांमध्ये पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा वाढता वापर करून खूप वेगात व्यवसाय उभारले, असे फोर्ब्जने म्हटले. याचा परिणाम म्हणून देशाच्या खूप यशस्वी महिलांना पूर्वी कधी नव्हते इतक्या लवकर श्रीमंत केले, असेही फोर्ब्जने म्हटले.
२0 वर्षांची
काइली अब्जाधीश
२0 वर्षीय अमेरिकन रिअॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनर हिने सर्वांत कमी वयात अब्जाधीश होण्याचा विक्रम केला आहे. कमी वयामध्ये सर्वाधिक कमाईच्या बाबतीत काइली जेनरने फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गलाही मागे टाकले आहे.
आतापर्यंत झुकरबर्ग हा सर्वांत तरुण वयात झालेला अब्जाधीश ठरला होता. काइली जेनरने वयाच्या १०व्या वर्षी ‘कीपिंग अप विद द कर्दाशियन’ या रिअॅलिटी शोमधून पदार्पण केले होते. काइली जेनर किम कर्दाशियनची छोटी बहीण आहे. पाच बहिणींमध्ये काइली जेनर सर्वांत लहान आहे.
नीरजा सेठी या सिन्टेल या माहिती व तंत्रज्ञान सल्लागार कंपनीच्या उपाध्यक्ष आहेत. १९८०मध्ये सेठी यांनी त्यांचे पती भारत देसाई यांच्यासोबत मिशिगनमधील ट्रोय येथे ही कंपनी फक्त दोन हजार डॉलर गुंतवून स्थापन केली होती.
२३ हजार कर्मचाऱ्यांच्या सिन्टेलचा २०१७मध्ये ९२४ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा महसूल होता. २३ हजार कर्मचाºयांत बहुसंख्य हे भारतीय आहेत.
जयश्री उल्लाल यांचा जन्म लंडनमधील. त्यांचे पालनपोषण भारतात झाले. त्या २००८पासून अरिस्टा नेटवर्क्स या संगणक नेटवर्किंग कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. २०१७मध्ये त्यांच्या कंपनीचा महसूल १.६ अब्ज अमेरिकन डॉलर होता.
श्रीमंत महिलांच्या यादीत जयश्री उल्लाल, नीरजा सेठी
अमेरिकेतील ६० अत्यंत श्रीमंत महिलांच्या फोर्ब्जच्या यादीत भारतीय वंशाच्या जयश्री उल्लाल (५७) आणि नीरजा सेठी (६३) यांनी स्थान पटकावले आहे. स्वत:च्या कष्टांनी श्रीमंत बनलेल्या महिलांची ही यादी आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 04:47 AM2018-07-13T04:47:24+5:302018-07-13T04:47:43+5:30