Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी जय्यत तयारी; लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर सत्र

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी जय्यत तयारी; लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर सत्र

मुहूर्त ट्रेडिंग पूर्णतः परंपरेशी संबंधित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 11:31 AM2023-11-04T11:31:45+5:302023-11-04T11:32:11+5:30

मुहूर्त ट्रेडिंग पूर्णतः परंपरेशी संबंधित आहे.

Jayat Prepares For Diwali Muhurat Trading; Session on the occasion of Lakshmi Puja | दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी जय्यत तयारी; लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर सत्र

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी जय्यत तयारी; लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर सत्र

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार बंद असतो. मात्र, मुहूर्ताच्या सौद्यांसाठी (मुहूर्त ट्रेडिंग) बाजार केवळ एक ते दीड तास सुरू केला जातो. यंदाच्या दिवाळीच्या ‘ मुहूर्त ट्रेडिंग ’ साठी शेअर बाजारात सध्या जय्यत तयारी सुरू आहे. दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा शेअर बाजारात जवळपास १९५७ पासून चालत आली आहे. तज्ज्ञांच्या मते, मुहूर्त ट्रेडिंग पूर्णतः परंपरेशी संबंधित आहे.

का केले जाते मुहूर्त ट्रेडिंग ? 
दिवाळीच्या दिवशी एक ते दीड तासाच्या मुहूर्तावर गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करून या परंपरेचे पालन करतात. लोकांचे असे मत आहे की, मुहूर्त ट्रेडिंगमध्ये समभाग खरेदी केल्यामुळे त्यांना संपूर्ण वर्षभर नफा मिळेल. 

असे आहे एनएसईचे 
मुहूर्त ट्रेडिंग सत्र
nब्लॉक डील सेशन : सायं. ५..४५ ते ६.०० 
nप्री-ओपन सेशन : सायं. ६.०० ते ६.०८ 
nनॉर्मल मार्केट सेशन : सायं. ६.१५ ते ७.१५ 
nकॉल ऑक्शन इलिक्विड सेशन : सायं. ६.२० ते ७.०५ 
nक्लोजिंग सेशन : सायं. ७.२५ ते ७.३५ 

लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर सत्र
मुहूर्त ट्रेडिंग सत्र साधारणतः लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर संध्याकाळी आयोजित केले जाते. दिवसभर सर्व एक्सचेंज बंद असतात. राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) दिवाळीच्या दिवशी म्हणजेच रविवार, १२ नोव्हेंबर रोजी मुहूर्त ट्रेडिंगसाठी विशेष सत्राची घोषणा केली आहे.

Web Title: Jayat Prepares For Diwali Muhurat Trading; Session on the occasion of Lakshmi Puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.