Join us

बेझोस यांची माजी पत्नी पुन्हा घटस्फोट घेणार; नव्या शिक्षक नवऱ्याशीही जुळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 11:52 AM

तीन वर्षांपूर्वी जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या शिखरावर असलेले बेझोस दाम्पत्याचा घटस्फोट झाला होता. आता सव्वा वर्षात बेझोस यांची पूर्व पत्नी पुन्हा घटस्फोट घेत आहे.

अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांची माजी पत्नी मॅकेंजी स्कॉट पुन्हा चर्चेत आली आहे. स्कॉट नव्या शिक्षक नवऱ्यासोबत घटस्फोट घेत आहे. सव्वा वर्षांपूर्वीच तिने पुन्हा लग्न केले होते. परंतू गेल्या सोमवारीच स्कॉटने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. 

तीन वर्षांपूर्वी जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या शिखरावर असलेले बेझोस दाम्पत्याचा घटस्फोट झाला होता. 25 वर्षे एकत्र राहिल्यानंतर जेफ बेजोस यांनी पत्नी मॅकेन्झी बेजोस हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. मॅकेन्झी बेजोस या अ‍ॅमेझॉन कंपनीच्या पहिल्या कर्मचारी होत्या. घटस्फोटानंतर मॅकेन्झी या अब्जाधीश झाल्या होत्या. कारण पोटगीसाठी त्यांना हजारो कोटींची संपत्ती मिळाली होती. जेफ बेजोस यांचे लॉरेन सांचेज हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. यातूनच जेफ आणि मॅकेन्झी यांचा घटस्फोट झाला होता. लॉरेन सांचेजला जेफ यांनी १६.६ कोटी डॉलर(१२०० कोटी रूपयांपेक्षा अधिक) किंमतीचे लॉस एंजेलिसमध्ये आलिशान घर खरेदी करून दिले होते.

यानंतर मॅकेन्झी बेजोस दुसरे लग्न करणार का याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. मॅकेन्झी यांनी त्यांच्या मुलाच्या शाळेत शिकविणाऱ्या सायन्सच्या शिक्षकाशी लग्न केले होते. डेन जेवेट असे या शिक्षकाचे नाव आहे. डेन एक चांगला व्यक्ती आहे आणि मी त्याच्यासोबत खूश आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. परंतू आता लग्नाला सव्वा वर्ष होत नाही तोच, मेकेन्झी यांनी घटस्फोटाचा टोकाचा निर्णय घेतला आहे. 

न्यूयॉर्क टाइम्सनुसार, स्कॉटने सोमवारी वॉशिंग्टन राज्यातील किंग काउंटी सुपीरियर कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. या अर्जाला नवऱ्याने विरोधही केलेला नाहीय. मेकेन्झी यांनी नवऱ्याचे नाव एक शपथेतून काढले होते, तेव्हापासून त्यांच्यात काहीतरी बिनसले असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. या जोडप्याकडे एक करार आहे, ज्यामध्ये स्थावर मालमत्ता आणि इतर वैयक्तिक मालमत्तेचे विभाजन कसे करावे हे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :अ‍ॅमेझॉन