Lokmat Money > बिझनेस न्यूज > Amazon चे नवे सीईओ कोण? जेफ बेजोस खूर्ची सोडणार; जाणून घ्या...

Amazon चे नवे सीईओ कोण? जेफ बेजोस खूर्ची सोडणार; जाणून घ्या...

Who is the new CEO of Amazon : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस सीईओ पद सोडणार असल्याची घोषणा अ‍ॅमेझॉनने केली आहे. ते गेल्या 26 वर्षांपासून सीईओ होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 11:54 AM2021-02-03T11:54:40+5:302021-02-03T11:56:20+5:30

Who is the new CEO of Amazon : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस सीईओ पद सोडणार असल्याची घोषणा अ‍ॅमेझॉनने केली आहे. ते गेल्या 26 वर्षांपासून सीईओ होते.

Jeff Bezos will leave Amazon ceo Post; andy jassy will be new CEO of Amazon | Amazon चे नवे सीईओ कोण? जेफ बेजोस खूर्ची सोडणार; जाणून घ्या...

Amazon चे नवे सीईओ कोण? जेफ बेजोस खूर्ची सोडणार; जाणून घ्या...

अ‍ॅमेझॉनचे (Amazon) मालक आणि सीईओ जेफ बेजोस यांनी सीईओपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही वर्षांपासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या य़ादीत ते पहिले होते. आता बेजोस यांच्या जागी अँडी जेसी (Andy Jassy) येणार आहेत. 


बेजोस यांनी सांगितले की, तिसऱ्य़ा तिमाहीमध्ये कंपनीचे सीईओपद सोडणार आहेत. त्यांच्या जागी अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे प्रमुख अँडी जेसी हे येणार आहेत. अमेझॉनच्या नफ्यामध्ये रेकॉर्डब्रेक वाढ झाल्यानंतर बेजोस यांनी हा निर्णय घेतला आहे. 


जेसी यांनी 1997 मध्ये अ‍ॅमेझॉन जॉईन केले होते. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले आहे. ते 53 वर्षांचे आहेत. जेसी यांना खेळ आणि संगितामध्ये आवड आहे. 2006 मध्ये त्यांनी अ‍ॅमेझॉन क्लाऊड सर्व्हिस प्लॅटफॉर्म एडब्ल्यूएसची स्थापना केली होती. जेसी यांच्या पत्नीचे नाव रोचेले कैप्लान यांच्याशी झालेली आहे. त्यांना दोन मुले आहेत. 
गेल्या वर्षी जेसी यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये भाषण केले होते. ''मी 1997 च्या पहिल्या शुक्रवारी एचबीएसची मुख्य परिक्षा दिली होती. त्याच्या पुढच्या सोमवारीच अ‍ॅमेझॉनमध्ये नोकरी सुरु केली. तेव्हा मला काम कोणत्या प्रकारचे असेल, माझे पद काय असेल याची कल्पनाही नव्हती.'', असे सांगितले होते. 


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस सीईओ पद सोडणार असल्याची घोषणा अ‍ॅमेझॉनने केली आहे. ते गेल्या 26 वर्षांपासून सीईओ होते. एका ऑनलाईन बुक स्टोअरच्या रुपात त्यांनी या कंपनीची स्थापना केली होती. पद सोडल्यानंतर ते कंपनीशी संबंधित पदावर राहणार आहेत. आता बेजोस कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. 


जेसी यांनी सुरु केलेल्या AWS चा वापर जगभरातील करोडो व्यापारी करत आहेत. या सेवेला मायक्रोसॉफ्टची Azure आणि अल्फाबेट इंकच्या गुगल क्लाउडची टक्कर मिळत आहे. अॅमेझॉनला पहिल्यांदाच 100 अब्ज डॉलरची विक्रमी विक्री करता आली आहे. 

Read in English

Web Title: Jeff Bezos will leave Amazon ceo Post; andy jassy will be new CEO of Amazon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.