नवी दिल्ली - इंडोनेशियात लायन एअरच्या विमानाला झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत, भारतातील नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) जेट एअरवेज व स्पाइसजेट या दोन कंपन्यांना दक्षता घ्यायच्या सूचना केल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांकडे ‘बोईग-७३७ मॅक्स’ विमाने आहेत.
या विमानाच्या सेंसरमध्ये समस्या आहेत. त्या लक्षात घेऊ न, आवश्यक ते बदल करण्यास आणि दक्षता बाळगण्यास डीजीसीएने सांगितले.
या सेंसरमध्ये काही त्रुटी असल्याचे अपघातानंतर लगेचच लक्षात आले होेते. त्या त्रुटी दूर न केल्यास वैमानिकाला विमानावर नियंत्रण ठेवणे अवघड होते. विमानाच्या उंचीचाही अंदाज चुकू शकतो. तसे झाल्यास ते वेगाने खाली येते, असे आढळून आले आहे. त्यामुळेच डीजीसीएने या विमानांच्या वापराबाबत अधिक खबरदारी घेण्यास सांगितले.
अपघातातही तसेच घडले
इंडोनेशियात पंधरा दिवसांपूर्वी लायन एअरचे याच पद्धतीचे विमान कोसळले होते. त्या अपघातात विमानाच्या कर्मचाऱ्यांसह १८९ जण मरण पावले होते. त्यात इंडोनेशियाच्या अर्थ खात्याचे २0 अधिकारीही होते. हे विमान उडत असतानाच, काही बिघाड झाला. तो लक्षात येण्याआधीच विमान खाली येऊ लागले आणि समुद्रात कोसळले. सेंसरमधील समस्या हीच अपघाताला कारणीभूत होती.
जेट एअरवेज आणि स्पाइसजेटला बाळगावी लागणार खबरदारी
इंडोनेशियात लायन एअरच्या विमानाला झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत, भारतातील नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) जेट एअरवेज व स्पाइसजेट या दोन कंपन्यांना दक्षता घ्यायच्या सूचना केल्या आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 05:31 AM2018-11-10T05:31:43+5:302018-11-10T05:32:03+5:30