मुंबई - कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) मागच्या वर्षी सप्टेंबरदरम्यान जेट एअरवेजच्या जमा-खर्चाचे दस्तावेज तपासल्यानंतर कंपनीशी संपर्क करण्याआधी मागच्या महिन्यात कंपनीकडून आणखी दस्तावेज आणि तपशील मागवण्यात आले. तिमाही वित्तीय परिणाम घोषित करण्यात जेट एअरवेजकडून झालेल्या दिरंगाईनंतर कंपनी व्यवहार मंत्रालयांतर्गत कंपनी निबंधकांनी मागच्या वर्षी आॅगस्टदरम्यान जेट एअरवेच्या जमा-खर्चाची तपासणी सुरू केली होती.
विशेष म्हणजे जागल्यानेही (व्हिसल ब्लोअर) कंपनी प्रवर्तकांनी घोटाळा केल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाला लेखी कळविले होते. त्यानंतर जमा-खर्च खंगाळणे सुरू झाले. आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचे आढळल्याने जेट एअरवेजचा व्यवहार चौकशीच्या घेºयात आला आहे.
कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या विभागीय निबंधकांनी (पश्चिम) सप्टेंबर २०१८ मध्ये जमा-खर्च तपासल्यानंतर कंपनीकडून काही ठराविक दस्तावेज आणि तपशील मागवला. त्यानंतर एप्रिल २०१९ मध्ये आणखी तपशील आणि दस्तावेज मागण्यात आले होते, असे जेट एअरवेजने शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कंपनी व्यवहार मंत्रालयाला आवश्यक तो तपशील आणि दस्तावेज देण्यात आला. तथापि, याबाबत कंपनीला कोणतेही सूचनापत्र मिळाले नाही, असेही जेट एअरवेजने म्हटले आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला कंपनी निबंधकांनी कंपनी व्यवहार मंत्रालयाला अहवाल सादर केला. कंपनी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आणि जेटच्या जमा-खर्चातील ठराविक निधीचा मागमूस लागत नाही, असे या अहवालात अधोरेखित करण्यात आले.
जेट एअरवेजचा व्यवहार चौकशीच्या घेऱ्यात
कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) मागच्या वर्षी सप्टेंबरदरम्यान जेट एअरवेजच्या जमा-खर्चाचे दस्तावेज तपासल्यानंतर कंपनीशी संपर्क करण्याआधी मागच्या महिन्यात कंपनीकडून आणखी दस्तावेज आणि तपशील मागवण्यात आले.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 06:00 AM2019-05-11T06:00:34+5:302019-05-11T06:01:00+5:30