नवी दिल्ली : देशा-परदेशातील आकाशात उंच झेप घेणारी जेट एअरवेज कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली असून, तिला कदाचित दोन महिन्यांत आपला व्यवसाय गुंडाळावा लागेल, अशी शक्यता आहे. खर्चामध्ये मोठी कपात न केल्यास ६० दिवसांत तिजोरीत खडखडाट निर्माण होईल आणि प्रसंगी सारेच बंद पडेल.या वृत्तामुळे कंपनीचे कर्मचारी व अधिकारी अतिशय अस्वस्थ आहेत. जेट एअरवेजने वेतनकपातीबरोबरच कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी स्वत:च दोन महिन्यांनी कंपनी चालविणे शक्य होणार नाही, असे कर्मचाºयांना सांगितले आहे. त्यामुळे खर्चाला कात्री लावावी लागेल, असे सांगून त्यांनी वेतनकपातीची घोषणा केली आहे. त्यामुळे अस्वस्थ व संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी, इतकी परिस्थिती इतक्यात व अचानक बिघडू शकत नाही हे आता अचानक आता का सांगितले, याची आधी कल्पना का दिली नाही, असा प्रश्न करण्यास सुरुवात केली आहे.
अशी परिस्थिती काल-परवा उद्भवलेली नाही. आधीपासून याचा अंदाज आला असणार. मग आम्हाला तेव्हाच विश्वासात का घेतले नाही, असा सवाल एका वरिष्ठ अधिकाºयाने केला. तो म्हणाला की, या प्रकारामुळे कर्मचाºयांचा कंपनीच्या व्यवस्थापनावरील विश्वासच उडायची पाळी आली आहे. मात्र कंपनी व्यवस्थापन आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार नाही. व्यवस्थापनाने पगारात २५ टक्के कपात करण्याचा विचार सुरू केला आहे. तसे केल्यास वर्षभरात ५00 कोटी रुपये खर्च कमी होईल, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने कर्मचाºयांना तसे स्पष्टपणे सांगितले आहे. आम्ही वेतनकपात करणार असून, भविष्यात त्याची फेड केली जाण्याची शक्यता नाही, असे नरेश गोयल यांनी सांगितले.
पैसे बचाव मोहीम
सतत तोट्यात असणा-या एअर इंडियाने आपल्या खर्चात शक्य आहे, तिथे कपात करण्याचे ठरविले आहे. त्याचा भाग म्हणून एक तास वा त्याहून कमी अंतराचा प्रवास असल्यास प्रवाशांना नाश्ता वा जेवण न देता, बिस्किटे वा तत्सम किरकोळ खाणे देण्याचे ठरविले आहे.
अर्थात त्यामुळे किती पैसे वाचतील, हे स्पष्ट झालेले नाही. एअर इंडिया सकाळच्या व दुपारनंतरच्या प्रवासात नाश्ता तर दुपारी व रात्री जेवण देत असे.
दोन महिन्यांत बंद पडू शकते जेट एअरवेज, पैसे बचाव मोहीम
देशा-परदेशातील आकाशात उंच झेप घेणारी जेट एअरवेज कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली असून, तिला कदाचित दोन महिन्यांत आपला व्यवसाय गुंडाळावा लागेल, अशी शक्यता आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 01:01 AM2018-08-04T01:01:16+5:302018-08-04T01:01:33+5:30