नवी दिल्ली : २०१९ मध्ये कोसळलेली जेट एअरवेज ही विमान वाहतूक कंपनी पुढील वर्षाच्या उन्हाळ्यापर्यंत म्हणजेच एप्रिल-मेमध्ये पुन्हा सुरू होऊ शकते, असे वृत्त आहे. कंपनीचे नवे प्रवर्तक मुरारीलाल जालान आणि कार्लोक कॅपिटल यांनी कंपनी लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. समाधान योजनेनुसार, देशातील सर्व स्लॉटस् परिचालनात आणण्याची, तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे, असे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जेट एअरवेज पुन्हा पुढच्या वर्षी सुरू?
२०१९ मध्ये कोसळलेली जेट एअरवेज ही विमान वाहतूक कंपनी पुढील वर्षाच्या उन्हाळ्यापर्यंत म्हणजेच एप्रिल-मेमध्ये पुन्हा सुरू होऊ शकते, असे वृत्त आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 06:30 AM2020-12-09T06:30:46+5:302020-12-09T06:31:18+5:30