Lokmat Money > बिझनेस न्यूज > जेट एअरवेज पायलटांची संख्या कमी करणार, काही विमाने करणार परत

जेट एअरवेज पायलटांची संख्या कमी करणार, काही विमाने करणार परत

आर्थिक संकटात असलेली जेट एअरवेज आपल्या पायलटांची संख्या कमी करण्याचा विचारात आहे, तसेच भाड्याने घेतलेल्या बोइंग-७३७ विमानांपैकी २३ विमाने मूळ कंपनीला परत करण्यावरही विचार सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 03:23 AM2018-10-27T03:23:36+5:302018-10-27T03:23:48+5:30

आर्थिक संकटात असलेली जेट एअरवेज आपल्या पायलटांची संख्या कमी करण्याचा विचारात आहे, तसेच भाड्याने घेतलेल्या बोइंग-७३७ विमानांपैकी २३ विमाने मूळ कंपनीला परत करण्यावरही विचार सुरू आहे.

Jet Airways will reduce the number of pilots and return to some planes | जेट एअरवेज पायलटांची संख्या कमी करणार, काही विमाने करणार परत

जेट एअरवेज पायलटांची संख्या कमी करणार, काही विमाने करणार परत

नवी दिल्ली : आर्थिक संकटात असलेली जेट एअरवेज आपल्या पायलटांची संख्या कमी करण्याचा विचारात आहे, तसेच भाड्याने घेतलेल्या बोइंग-७३७ विमानांपैकी २३ विमाने मूळ कंपनीला परत करण्यावरही विचार सुरू आहे.
कंपनीला विमानांचे भाडे भरणे अशक्य बनले आहे. जेटच्या प्रवक्त्याने मात्र यावर थेट भाष्य टाळले. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना प्रवक्ता म्हणाला की, दिशाभूल करणारी माहिती माध्यमांनी देऊ नका, असे आवाहन आम्ही करीत आहोत. कंपनी पायलटांची संख्या ४० ते ५० वर आणणार आहे. सध्या कंपनीकडे १,८०० पायलट व चालक दल सदस्य आहेत. मुंबई, दिल्ली व बंगळुरूतील काही कर्मचाऱ्यांना कंपनीने बिनपगारी रजा घेण्याचे आवाहन केले आहे.
>१०,८७८ कोटी रुपयांचा तोटा
जेट एअरवेज आपले वाहतूक व्यवहारही कमी करीत आहे. रोजच्या विमान उड्डाणात कपात केली आहे. कंपनीकडे १२४ विमाने आहेत, तसेच कंपनीवर ८,६२० कोटींचे कर्ज आहे, ज्यातील १,९६८ कोटींचे कर्ज विमानांशी संबंधित आहे. कंपनीचा तोटा १०,८७८ कोटी इतका आहे. कंपनीने काटकसरीचे धोरण स्वीकारले असून, दोन वर्षांत २ हजार कोटी वाचविण्याची योजना आखली आहे. आॅगस्टमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली.

Web Title: Jet Airways will reduce the number of pilots and return to some planes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.