मुंबई : यंदाच्या धनत्रयोदशीच्या दिवशी रत्ने व दागदागिन्यांची विक्री २५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. यंदाचा चांगला मान्सून, तसेच वाढलेली ग्राहकी, यामुळे उल्लेखनीय विक्री होणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.
धनत्रयोदशीच्या दिवशी दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे (जीजेएफ) चेअरमन श्रीधर जीवी यांनी सांगितले की, ‘यंदा बाजारधारणा मजबूत असल्याचे दिसून येत आहे. किमती मोठ्या प्रमाणात स्थिर आहेत. याशिवाय चांगला मान्सून आणि वाढलेली मागणी यामुळे विक्री वाढणार आहे. यंदा विक्रीत २0 ते २५ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. यंदा उत्तरेकडून येणाऱ्या बातम्या चांगल्या आहेत.’
हा सण उत्तरेत अधिक
लोकप्रिय आहे. गीतांजली जेम्सचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक मेहुल चौकसी यांनी सांगितले की, ‘यंदाच्या हंगामाची सुरुवात चांगली झाली आहे. सामान्य कल चांगला आहे. त्यामुळे आम्हाला विक्रीत २५ ते ३५ टक्के वाढीची अपेक्षा आहे.’ (प्रतिनिधी)
धनत्रयोदशीला दागिने विक्री २५% वाढणार
यंदाच्या धनत्रयोदशीच्या दिवशी रत्ने व दागदागिन्यांची विक्री २५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. यंदाचा चांगला मान्सून, तसेच वाढलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 04:55 AM2016-10-27T04:55:48+5:302016-10-27T04:55:48+5:30