मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा योग साधत सोने खरेदीसाठी मंगळवारी सराफ बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी खच्चून गर्दी केली होती. देशभरात तब्बल १५ हजार कोटी, तर महाराष्ट्रात अडीच हजार ते तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा सराफ बाजारांनी केला आहे.
मुंबईच्या खरेदी-विक्रीचा ठोस आकडा सांगता आला नसला तरी तब्बल दोन वर्षांनी सराफ बाजार आता वधारत असून, सोन्याला पूर्वीप्रमाणे मागणी येत असल्याचे झवेरी बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
मेमध्ये विवाह मुहूर्त जास्त असल्याने ग्राहकांनी त्यानुसार सोन्याची खरेदी केली. लग्न समारंभातील दागिन्यांना अधिक मागणी होती.
कुमार जैन, अध्यक्ष,
मुंबई ज्वेलर्स असोसिएशन