Jhunjhunwala Portfolio Stock: शेती आणि बांधकाम उपकरणे बनवणाऱ्या एस्कॉर्ट्स कुबोटा(Escorts Kubota) कंपनीच्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्म नुवामाने(Nuvama) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा दुपटीने वाढला आहे. दीर्घकाळात, हे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, एस्कॉर्ट्स कुबोटाची दुसऱ्या तिमाहीत कामगिरी मजबूत राहिली आहे, आउटलुकदेखील चांगले आहे. विशेष म्हणजे, हा स्टॉक झुनझुनवाला पोर्टफोलिओचा भाग आहे.
एस्कॉर्ट्स कुबोटा: 1 वर्षात 30% परतावा देणार
ब्रोकरेज हाऊस नुवामाने एस्कॉर्ट्स कुबोटाला BUY रेटिंग दिले आहे. 12 महिन्यांनंतर प्रति शेअर लक्ष्य 4000 रुपये ठेवण्यात आले आहे. 3 नोव्हेंबर 2023 रोजी शेअरची किंमत 3,077 रुपयांवर बंद झाली. अशा प्रकारे, स्टॉकला सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 30 टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या एका वर्षात स्टॉकने सुमारे 58 टक्के परतावा दिला आहे, तर 5 वर्षांत 350 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.
ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, Q2FY24 मध्ये कंपनीचा ऑपरेटिंग नफा (EBITDA) 72 टक्के (YoY) 263 कोटी रुपयांवर गेला आहे. CE/रेल्वेमधील चांगल्या नफ्यामुळे EBITDA अपेक्षेपेक्षा जास्त होता. ब्रोकरेजचा विश्वास आहे की, एस्कॉर्ट्स पुढील पाच वर्षांत कुबोटा उद्योगाच्या दुप्पट विकास साध्य करू शकतो. FY23-26E/FY23-28E दरम्यान महसूल CAGR 23%/20% आणि EPS CAGR 44%/33% असू शकतो.
एस्कॉर्ट्स कुबोटा: Q2 चे निकाल कसे होते?
एस्कॉर्ट्स कुबोटाचा एकत्रित निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाहीत दुप्पट होऊन रु. 223 कोटी झाला आहे. बांधकाम आणि रेल्वे उपकरणे विभागातील मजबूत विक्रीमुळे कंपनीला मोठा नफा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 99 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 2154 कोटी रुपये झाले आहे, जे एका वर्षापूर्वी 1969 कोटी रुपये होते. या तिमाहीत कंपनीची ट्रॅक्टर विक्री 22,024 युनिट्सवर होती. जी एका वर्षापूर्वी सप्टेंबर तिमाहीत 23,703 युनिट्स होते.
झुनझुनवाला पोर्टफोलिओमध्ये कुबोटा एस्कॉर्ट्स
अनुभवी बाजार गुंतवणूकदारराकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये या स्टॉकचा समावेश आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला त्यांचा पोर्टफोलिओ पाहतात. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत एस्कॉर्ट्स कुबोटामध्ये 1.6 टक्के स्टेक (1,79,388 इक्विटी शेअर्स) आहेत. त्याची किंमत 550.8 कोटी रुपये आहे. रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये 25 शेअर्स आहेत, ज्यांची एकूण किंमत 35,237.7 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)