Join us

Jio 5G: वेलकम ५G अंतर्गत जिओची ५० शहरात सेवा, महाराष्ट्रात 'तीन' जिल्ह्यात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 7:11 PM

देशात आत्तापर्यंत १८४ शहरांमध्ये ५ जीची सेवा पोहोचली असून ५० शहरांत वेलकम जिओ ५जी अंतर्गत ही सेवा देण्यात आली आहे.

मुंबई - देशात ५ जी नेटवर्कला सुरुवात झाली असून लवकरच देशभरातील बहुतांश शहरात ५ जी सेवा अनुभवायला मिळेल. जिओने देशातील काही प्रमुख शहरांतील विमानतळावर सुरुवातील जिओची ५ जी सेवा सुरू केली आहे. त्यानंतर, आता ५ जी सेवेचा विस्तार करण्यात येत आहे. त्यानुसार, आता ५० शहरांमध्ये जीओ ५ जी सेवा सुरू करण्यात आली आहे. देशातील १७ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ५० शहरांमध्ये ही सेवा सुरू झाली असून महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात जिओ ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. 

देशात आत्तापर्यंत १८४ शहरांमध्ये ५ जीची सेवा पोहोचली असून ५० शहरांत वेलकम जिओ ५जी अंतर्गत ही सेवा देण्यात आली आहे. जिओकडून इनवाइट बेस्ड सिस्टम बनवली आहे. ही इनवाइट माय जिओ अॅपवरून मिळेल. यात यूजर्सला एकदम फ्री मध्ये १ जीबीपीएसने हाय स्पीडवर इंटरनेट डेटा मिळू शकणार आहे. जिओ कंपनीचा दावा आहे की, हे जगातील सर्वात मोठे ५जी रोलआउट आहे. दरम्यान, देशातील ५० शहरांमध्ये ५ जी सेवेचा प्रारंभ झाला असून त्यात महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांतीलग्राहकांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये, कोल्हापूर, सांगली आणि नांदेड वाघाला या शहरांचा समावेश आहे. 

या ५० शहरात Jio True 5G सर्विस लाँच

१. चित्तूर आंध्र प्रदेश२. कडप्पा आंध्र प्रदेश३. नरसरावपेट आंध्र प्रदेश४. ओंगोल आंध्र प्रदेश५. राजमहेंद्रवरम आंध्र प्रदेश६. श्रीकाकुलम आंध्र प्रदेश७. विजयनगरम आंध्र प्रदेश८. नगांव आसाम९. बिलासपुर छत्तीसगढ़१०. कोरबा छत्तीसगढ़११. राजनांदगांव छत्तीसगढ़१२. पणजी गोवा१३. अम्बाला हरियाणा१४. बहादुरगढ़ हरियाणा१५. हिसार हरियाणा१६. करनाल हरियाणा१७. पानीपत हरियाणा१८. रोहतक हरियाणा१९. सिरसा हरियाणा२०. सोनीपत हरियाणा२१. धनबाद झारखंड२२. बागलकोट कर्नाटक२३. चिक्कमगलुरु कर्नाटक२४. हसन कर्नाटक२५. मांड्या कर्नाटक२६. तुमकुरु कर्नाटक२७. अलाप्पुझा केरल

२८. कोल्हापुर महाराष्ट्र२९. नांदेड़-वाघाला महाराष्ट्र३०. सांगली महाराष्ट्र

३१. बालासोर ओडिशा३२. बारीपदा ओडिशा३३. भद्रक ओडिशा३४. झारसुगुड़ा ओडिशा३५. पुरी ओडिशा३६. संबलपुर ओडिशा३७. पुडुचेरी पुडुचेरी३८. अमृतसर पंजाब३९. बीकानेर राजस्थान४०. कोटा राजस्थान४१. धर्मपुरी तमिलनाडु४२. इरोड तमिलनाडु४३. थूथुकुडी तमिलनाडु४४. नलगोंडा तेलंगाना४५. झांसी उत्तर प्रदेश४६. अलीगढ़ उत्तर प्रदेश४७. मुरादाबाद उत्तर प्रदेश४८. सहारनपुर उत्तर प्रदेश४९. आसनसोल पश्चिम बंगाल५०. दुर्गापुर पश्चिम बंगाल

५ जी नेटवर्क दोन प्रकारे काम करते

5G नेटवर्क भारतात दोन प्रकारे काम करते. यामध्ये जिओ स्टँड अलोन 5जी नेटवर्कवर काम करते, तर एअरटेल नॉन स्टँड अलोन नेटवर्कवर काम करते. नॉन स्टँड अलोन नेटवर्कमध्ये फक्त 4G टॉवर अपग्रेड केले जाते, तर स्टँड अलोनमध्ये 4G टॉवरची मदत घेतली जात नाही. म्हणजेच स्वतंत्र टॉवर असतो. हेच कारण आहे की Jio चे 5G इंटरनेट Mi 10 आणि Mi 10i स्मार्टफोनमध्ये काम करू शकणार नाही. या दोन्ही स्मार्टफोन्सना 5G स्टँडअलोन किंवा 5G SA सॉफ्टवेअर दिलेले नाही. 

टॅग्स :रिलायन्स जिओजिओ५जीसांगलीकोल्हापूर