Lokmat Money > बिझनेस न्यूज > नवीन वर्षात Jio चे रिचार्ज महागणार? कंपनीने दिले स्पष्टीकरण, वाचा...

नवीन वर्षात Jio चे रिचार्ज महागणार? कंपनीने दिले स्पष्टीकरण, वाचा...

Jio 5G Price Hike: Jio सह इतर टेलिकॉम कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 09:35 PM2023-10-31T21:35:10+5:302023-10-31T21:36:10+5:30

Jio 5G Price Hike: Jio सह इतर टेलिकॉम कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Jio 5G Price Hike-jio-will-not-increase-tariff-even-after-5g-launch | नवीन वर्षात Jio चे रिचार्ज महागणार? कंपनीने दिले स्पष्टीकरण, वाचा...

नवीन वर्षात Jio चे रिचार्ज महागणार? कंपनीने दिले स्पष्टीकरण, वाचा...

Jio 5G Price Hike: दरवर्षी वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांत जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज महाग झाल्याची चर्चा सुरू होते. याचे कारण म्हणजे, गेल्या काही वर्षांचा ट्रेंड आहे. गेल्या काही वर्षांत Jio, Airtel आणि इतर ब्रँड्सनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. कंपन्यांनी वर्षाच्या शेवटी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. यंदाही रिचार्जच्या किमती वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Jio योजनांच्या किंमती वाढवणार आहे का?
जिओने सांगितले होते की, 2023 च्या अखेरीस ते देशभरात त्यांची 5G सेवा सुरू करतील. त्यामुळे जिओदेखील रिचार्जच्या किमती वाढवणार असल्याची चर्चा आहे. याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. रिपोर्टनुसार, जिओ सध्या आपल्या प्लॅन्सच्या किमती वाढवणार नाही. 5G सेवा पूर्ण झाल्यानंतरही कंपनी आपल्या रिचार्जमध्ये वाढ करणार नाही.

नवीन फोन लॉन्च केले

कमी खर्चात लोकांना चांगली सेवा देण्यावर जिओ भर देत आहे. कंपनीला आपली सेवा विशेषतः 2G नेटवर्क वापरणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. अलीकडे, जिओने अनेक स्वस्त फीचर फोन लॉन्च केले आहेत, ज्याचा उद्देश 2G युजर्सना परवडणाऱ्या किमतीत 4G सेवेत आणणे हा आहे. कंपनीने Jio Phone Bharat सीरिज लॉन्च केली. यात दोन फोन आहेत. यानंतर कंपनीने Jio Phone B1 सीरीज लॉन्च केली. अलीकडेच कंपनीने JioPhone Prima 4G नावाचा आणखी एक फीचर फोन लॉन्च केला आहे.

कंपनी काय म्हणते?
जिओचे अध्यक्ष मॅथ्यू ओमन यांनी सांगितले की, दरवाढ कंपनीच्या धोरणात समाविष्ट नाही. त्याऐवजी, कंपनी अधिकाधिक युजर जोडण्याचे काम करत आहे. ते म्हणाले, 'एक उद्योग म्हणून आमचे काम सर्वसमावेशकतेला चालना देणे आहे. 20 कोटींहून अधिक युजर्स अजूनही 2G कनेक्टिव्हिटीद्वारे इंटरनेट वापरतात. टेलिकॉम सेक्टरला 'टूजी फ्री' करणे हाच एकमेव उद्देश आहे. 

Web Title: Jio 5G Price Hike-jio-will-not-increase-tariff-even-after-5g-launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.