Join us

सॅटलाईट इंटरनेटवरून जिओ-एअरटेल आमनेसामने, पाहा काय आहे हे; केव्हापासून मिळणार कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 8:58 AM

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या देशातील सर्वात मोठ्या दूरसंचार कंपन्या यांच्यात पुन्हा एकदा नव्यानं स्पर्धा रंगणार आहे.

Satellite Internet: आता रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि भारती एअरटेल (Bharati Airtel) या देशातील सर्वात मोठ्या दूरसंचार कंपन्या यांच्यात पुन्हा एकदा नव्यानं स्पर्धा रंगणार आहे. दरम्यान, आगामी काळात देशात सॅटेलाइट इंटरनेटची तयारी सुरू आहे. भारती एअरटेलच्या वन वेबला सॅटलाईट इंटरनेटसाठी इन स्पेसमधून आवश्यक ती मंजुरी मिळालीये. अलीकडेच, भारती एअरटेलच्या वन वेबनं याबाबत माहिती शेअर केली आहे. इन स्पेस (IN-SPACE) ही एक सरकारी संस्था आहे. हे अंतराळातील अॅक्टिव्हिटींचं नियमन करण्यासाठी आणि देशात अंतराळ अॅक्टिव्हिटिंचं आयोजित करण्यास परवानगी देण्याचं काम करते.भारती एअरटेल पहिली कंपनीही मंजुरी मिळवून भारती एअरटेलच्या मालकीची वन वेब ही देशातील पहिली संस्था ठरली आहे. एअरटेलला ग्रामीण आणि इंटरनेटनं जोडले गेले नसलेल्या भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. कंपनी लोकांना हाय स्पीड आणि कमी लेटन्सी इंटरनेट देण्याची तयारी करत आहे. दरम्यान, सॅटेलाइट इंटरनेटच्या क्षेत्रात जिओचं मालक मुकेश अंबानी यांची थेट स्पर्धा सुनील मित्तल यांच्या एअरटेलशी होणार आहे.प्राथमिक टप्पाभारतातील सॅटकॉम मार्केट अजूनही त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. परंतु ग्रामी आणि दुर्गम भागात याच्या शक्यता अधिक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताची अंतराळ अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत १३ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. जिओचीही तयारीरिलायन्स जिओनं देशातील दुर्गम भागातही हाय-स्पीड इंटरनेटचा वापर सुनिश्चित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान लाँच केलं आहे. 'जिओ स्पेस फायबर' असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे. देशभरात जिओ स्पेस फायबर कमी किमतीत उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.दिग्गज आमनेसामनेIN-SPACE कडून मंजुरीसह, युटेलसैट वनवेबनं सर्व आवश्यक परवानग्या मिळवल्या आहेत. आता व्यावसायिक कनेक्टिव्हिटी सेवा सुरू करण्यासाठी दूरसंचार विभागाकडून (DoT) स्पेक्ट्रम वाटप आवश्यक आहे.  काही महिन्यांपूर्वी भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी वन वेबच्यासॅटकॉम सेवांसाठी येत्या पाच-सहा वर्षात केवळ इलॉन मस्क यांच्या मालकीचे स्टारलिंक आणि अॅमेझॉन हे स्पर्धक असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी रिलायन्स जिओला आपलं स्पर्धक मानलं नव्हतं.

टॅग्स :मुकेश अंबानीसुनिल मित्तलरिलायन्स जिओएअरटेल