मुंबई: मोबिलिटी सोल्युशन दाता ‘जिओ-बीपी’ने ‘यू डिझर्व्ह मोअर’ नावाची नवी मोहीम सुरू केली आहे. भारताचा इंधन अनुभव उंचावण्यासाठी ही मोहीम हाती घेतली असून, ब्रॅण्डमार्फत देण्यात येणाऱ्या इतर अनेक सुविधांवर यात भर देण्यात येणार आहे.
‘जिओ-बीपी’ हा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडचा ब्रॅण्ड आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळातून शतकमहोत्सवाकडे वाटचाल करताना जागतिक ऊर्जाक्षेत्रात भारत हा एक तेज:पुंज तारा म्हणून आपले स्थान कायम ठेवील, असा या ब्रॅण्डचा विश्वास आहे. त्यासाठीच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. कामगिरी, सेवा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा ३ स्तंभावर ही मोहीम उभी आहे. ४.३ टक्के अधिक मायलेज देणारे डिझेल आणि इंजिनास १० पट स्वच्छ ठेवणारे पेट्रोल हे या मोहिमेचे मुख्य आधार आहेत. यात आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित ‘ॲक्टिव्ह’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याच्या जोडीला जिओ-बीपी पल्स ईव्ही चार्जिंग पॉइंट्सही आहेच. माेहिमेत जिओ-बीपी मोबिलिटी स्टेशनवर देण्यात येणाऱ्या अनेक सुविधा ‘हायलाइट’ करण्यात येणार आहेत. या खाद्यपदार्थ, मिठाई आणि प्रवासासाठी गरजेच्या वस्तू विकणारे व २४ तास उघडे असणारे शॉप्स इत्यादी आहेत. आंतरराष्ट्रीय
ब्रॅण्ड ‘वाइल्ड बिन कॅफे’च्या सिग्नेचर कॉफीचाही त्यात समावेश आहे. (वा. प्र.)