नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि यूकेच्या बीपी यांच्यातील इंधन आणि वाहतूक संयुक्त उपक्रम असलेल्या जिओ-बीपीने (Jio-BP)गुरुवारी भारतातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या ऑल-इलेक्ट्रिक राईड-हेलिंग प्लॅटफॉर्म, ब्लूस्मार्टसोबत (BluSmart)करार करण्याची घोषणा केली. या कराराच्या माध्यमातून, व्यापारी EV चार्जिंग स्टेशन नेटवर्क देशभरात मोठ्या प्रमाणावर स्थापित केले जाईल. भागीदारी म्हणून, जिओ-बीपी देशभरातील प्रवासी इलेक्ट्रिक वाहने आणि ताफ्यांसाठी ही स्थानके उभारणार आहे.
ब्लूस्मार्ट आपल्या ऑल इलेक्ट्रिक फ्लीटद्वारे दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील मोबिलीटीमध्ये हलचल निर्माण करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा ताफा चालवणाऱ्या ब्लूस्मार्टने भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये आपले नेटवर्क वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बीपी पल्ससह बीपीच्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत जिओ-बीपी आपल्या ग्राहकांना ईव्ही तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करण्याचा प्रयत्न करते. बीपी पल्सचे यूकेमध्ये देशातील सर्वात मोठे ईव्ही चार्जिंग नेटवर्क आहे, असे जिओ-बीपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश सी मेहता म्हणाले.
याचबरोबर, ब्लूस्मार्ट मोठ्या ईव्ही चार्जिंग सुपरहब्स चालवते जे वाढत्या ईव्ही फ्लीटला शक्ती देते. ईव्ही सुपरहब्स हे ईव्ही चार्जिंगचे भविष्य आहे कारण ते ग्राहकांना आणि राईड-हेलिंग फ्लीट्सला मुंबलक चार्जिंग देते, येत्या काळात आम्ही सोबत मिळून जगातील काही सर्वात मोठे ईव्ही सुपरहब तयार करू,असे ब्लूस्मार्टचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल जग्गी यांनी सांगितले.
एअरटेल ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरटेल आपल्या दोन प्रीपेड रिचार्जसोबत विनामूल्य मुदत जीवन विमा देते. #Airtel#insurance https://t.co/7owZoxfzZb
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2021
दरम्यान, रिलायन्सने 2030 पर्यंत नेट-झिरो कार्बन कंपनी बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि ब्लूस्मार्टसोबत ही भागीदारी कमी कार्बन, स्वच्छ आणि अधिक परवडणारे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. एक इंटीग्रेटेड ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्लेयर म्हणून, जिओ-बीपी सर्व वाहनांच्या श्रेणींसाठी ईव्ही फिक्स्ड चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी ओईएम, टेक्नॉलॉजी आणि प्लॅटफॉर्म कंपन्यांसह सक्रिय भागीदारी करत आहे. जिओ-बीपी विद्युतीकरणामध्ये ग्लोबल-लर्निंगचा लाभ घेईल आणि भारतीय बाजारात त्यांची अंमलबजावणी करेल.
भारतातील वाहतुकीच्या पर्यायांसाठी समाधान प्रदाता बनण्याचे लक्ष्य ठेवून, जिओ-बीपीची योजना 21 राज्यांमध्ये रिलायन्सच्या उपस्थितीत आणि जिओ डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या लाखो ग्राहकांना लाभ घ्यायचा आहे. जिओ-बीपीने पुढील काही वर्षांमध्ये पेट्रोल पंपांची सध्याची संख्या वाढवून 5500 पर्यंत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या जीओ-बीपीच्या पेट्रोल पंपांची संख्या 1400 आहे.