jio cheap recharge : मोबाईल रिचार्जच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण स्वस्तात चांगल्या ऑफर्स शोधत असतो. तुम्ही देखील हाच विचार करत असाल तर तुमच्यासाठी जिओने चांगली ऑफर आणली आहे. जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतो. यामध्ये युजर्सना स्वस्त ते महाग असे सर्व प्रकारचे रिचार्ज प्लॅन मिळतात.
तुम्हीही जिओ यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये कंपनी कमी किंमतीतही पूर्ण १ वर्षाची वैधता ऑफर करत आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये युजर्सना संपूर्ण वैधतेसाठी अमर्यादित कॉलिंगचा लाभही मिळतो. जिओचा हा रिचार्ज अवघा १७४८ रुपयांचा आहे.
वाचा - 'या' ५ कारणांमुळे शेअर बाजार रॉकेट! ७ दिवसात वारं फिरलं; शेवटचं सर्वात महत्त्वाचं
जिओचा १७४८ रुपयांचा प्लॅनजिओचा १७४८ रुपयांचा प्लॅन ३३६ दिवसांच्या वैधतेसह येतो, याचा अर्थ तुम्हाला सुमारे १ वर्षासाठी रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना मोफत अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. यासोबतच तुम्हाला ३६०० मोफत एसएमएसचाही लाभ मिळतो. जिओच्या या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा मिळत नाहीत. जिओ या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना जिओ TV आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देतो.
हा प्लॅन कोणासाठी फायद्याचा आहे?जिओच्या १७४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा मिळत नाहीत. अशा परिस्थितीत, हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम आहे जे डेटा वापरत नाहीत. याशिवाय जिओचा हा प्लॅन वाय-फाय वापरणाऱ्यांसाठीही उत्तम आहे. अजूनही देशातील बहुसंख्य लोक फिचर्स फोन वापरता. त्यामुळे त्यांना डेटाची गरज भासत नाही. अशा सर्व वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन उपयुक्त आहे.