शार्क टँक इंडियाच्या यापूर्वीच्या दोन सीझन्सना चांगला प्रतिसाद मिळाला होता. सध्या शार्क टँक इंडियाच्या तिसऱ्या सीझनचं चित्रिकरण सुरू आहे. हा शो कधीपासून ऑन एअर होईल याबाबत सध्या माहिती देण्यात आलेली नाही. परंतु आता शार्क टँक इंडियाच्या तिसर्या सीझनपूर्वी ओटीटीवर आणखी एक बिझनेस रिअॅलिटी शो येत आहे. याचं नाव 'इंडियन एंजल्स' असं आहे, हा OTT वर जगातील पहिला एंजेल इन्व्हेस्टमेंट शो असल्याचं म्हटलं जात आहे. ३ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून हा शो सुरू होणार आहे. हा शो जिओ सिनेमावर प्रसारित होणार आहे. आठवड्यातून याचे दोन भाग प्रसारित केले जातील आणि यात व्यवसायातील दिग्गज मंडळी स्टार्टअप चालवण्याचं ज्ञान देतील. या शोमध्ये प्रेक्षकांना यात दाखवण्यात आलेल्या स्टार्टअपशी जोडण्याची अनोखी संधी मिळणार आहे.पॅनलमध्ये कोण कोण?लोक या शो ची शार्क टँक इंडियाशी तुलना करत आहेत. परंतु इंडियन एंजल्स त्यापेक्षा वेगळं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या शोच्या पॅनलमध्ये सुप्रसिद्ध बिझनेस लीडर्सचा समावेश असेल. कायनेटिक ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर अजिंक्य फिरोदीया, इन्शुरन्सदेखोचे फाऊंडर आणि सीईओ अंकित अग्रवाल, शोबितमच्या को फाऊंडर आणि चीफ प्रोडक्ट ऑफिसर अपर्णा त्यागराजन, व्हॅल्यू ३६० चे फाऊंडर आणि सीईओ कुणाल किशोर, EaseMyTrip चे को फाऊंडर रिकान्त पिट्टी आणि टी.ए.सी - द आयुर्वेदा कंपनीच्या सीईओ आणि को फाऊंडर श्रीधा सिंह या शोद्वारे स्टार्टअपचं ज्ञान देतील.या शोबाबत पहिल्यापासूनच उत्तम प्रतिक्रिया मिळत आहे. स्टार्टअपमध्ये भारतीय प्रेक्षकांचा वाढता कल पाहून हा शो तयार करण्यात आला आहे. याद्वारे प्रेक्षकांना आपल्या आवडत्या स्टार्टअपमध्ये सक्रियरित्या सहभागी होण्याची संधी मिळेल. सर्वांनाच एक चांगला अनुभव मिळणार असून आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांसाठी आतुर आहोत, अशी प्रतिक्रिया डिजिकोर स्टुडिओजचे फाऊंडर आणि सीईओ अभिषेक मोरे यांनी दिली.
शार्क टँकला आता Jio Cinema देणार टक्कर, येणार 'इंडियन एंजल्स'; शोमध्ये कोण असणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 10:21 AM