मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ‘जिओ’ने आता रोज अतिरिक्त 1.50 जीबी डेटा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता 149 रुपयांचं रिचार्ज केल्यावर तुम्हाला दररोज 3 जीबी 4जी डेटाचा लाभ घेता येणार आहे. तर 799 रुपयांच्या रिचार्जवर सर्वाधिक 6.50 जीबी डेटा रोज मिळणार आहे.याखेरीज 300पेक्षा अधिक रुपयांचे रिचार्ज करणा-यांना थेट 100 रुपये व 300 पेक्षा कमी रुपयांच्या रिचार्जवर 20 टक्के सवलत मिळणार असल्याची घोषणाही कंपनीने केली आहे. जिओच्या या धमाका ऑफरचा लाभ 12 जून 2018च्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 30 जून 2018 पर्यंत रिचार्ज केल्यावरच मिळणार आहे. 12 जून ते 30 जून 2018पर्यंत याचा कालावधी मर्यादित करण्यात आला आहे. जिओनं या ऑफरच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या भारती एअरटेलला आव्हान दिलं आहे.एअरटेलनंही गेल्या काही दिवसांपूर्वी कमी किंमतीच्या प्रीपेड रिचार्ज पॅकमध्ये अशाच प्रकारची ऑफर दिली होती. कोणत्याही प्लॅनच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जिओ वापरकर्त्याला पहिल्याप्रमाणेच अनलिमिटेड व्हॉइस कॉल, प्रत्येक दिवशी 100 मोफत एसएमएस आणि जिओ अॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यानं दिवसाला 3 जीबी डेटा संपवल्यास त्याचं नेट सुरूच राहणार असून, स्पीड कमी होणार आहे.
‘जिओ’चा पुन्हा धमाका, दररोज देणार 3 जीबी डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 9:29 PM