Join us  

Jio Finance ची पर्सनल लोन सेगमेंटमध्ये एन्ट्री, लवकरच अन्य प्रकारची कर्जही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 4:18 PM

दिग्गज भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसनं वैयक्तिक कर्ज व्यवसायात प्रवेश केलाय.

jio financial services share: दिग्गज भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसनं (Jio Financial Services) वैयक्तिक कर्ज (Personal Loan) व्यवसायात प्रवेश केलाय. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली. माय जिओ (My Jio) अॅपवर वैयक्तिक कर्जाची सुविधा सुरू केली आहे आणि ३०० ऑफलाइन स्टोअरमध्ये कंझ्युमर ड्युरेबल लोनचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. माय जिओ हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलिकॉम व्यवसायाचे अॅप आहे. यात बिल भरणं आणि मनोरंजन यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. My Jio अॅपचे 25.02 कोटी मंथली अॅक्टिव्ह युझर्स आहेत. अन्य बाब म्हणजे पेटीएमच्या मंथली अॅक्टिव्ह युझर्सची संख्या २७.९ मिलियन, तर PhonePe च्या मंथली अॅक्टिव्ह युझर्सची संख्या ३९ मिलियन आहे.अनेक योजनांवर कामजिओ फायनान्शिअल सेल्फ एम्पलॉईड लोकांना कर्ज देण्याच्या योजनेवर काम करत आहे. यासोबतच लघु उद्योग आणि सोल प्रोपराइटर यांना वैयक्तिक कर्ज देण्याच्या योजनेवरही काम सुरू आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ऑटो आणि होम लोनसह शेअर्स तारण ठेवून निधी उपलब्ध करून देण्याच्या योजनेवरही काम करत आहे. Jio Financial गेल्या काही काळापासून मर्चंट पेमेंटवर भर देत आहे. कंपनी साउंड बॉक्स किंवा स्पीकरवर देखील काम करत आहे, ज्याद्वारे मर्चंट पेमेंटवर लक्ष केंद्रित केलं जातं.

जिओ फायनान्शियलनं २४ विमा कंपन्यांशी करार केला आहे ज्यात जीवन, सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांचा समावेश आहे. कंपनी विमा ब्रोकिंग व्यवसायातही मोठी टक्क देण्याच्या तयारत आहे. या व्यवसायात Jio Financial पॉलिसी बाजार सारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करते.

टॅग्स :जिओव्यवसाय