Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, 'या' दिवशी बाजारात लिस्ट होणार Jio Financial चे शेअर्स

गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, 'या' दिवशी बाजारात लिस्ट होणार Jio Financial चे शेअर्स

Jio Financial Services Shares Listing: शेअर बाजारात लवकरच मुकेश अंबानी यांची नवीन कंपनी लिस्ट होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 05:21 PM2023-08-18T17:21:39+5:302023-08-18T17:22:55+5:30

Jio Financial Services Shares Listing: शेअर बाजारात लवकरच मुकेश अंबानी यांची नवीन कंपनी लिस्ट होणार आहे.

Jio Financial Services Shares Listing: Good news for investors, shares of Jio Financial will be listed in the market on this day | गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, 'या' दिवशी बाजारात लिस्ट होणार Jio Financial चे शेअर्स

गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, 'या' दिवशी बाजारात लिस्ट होणार Jio Financial चे शेअर्स

Jio Financial Services Shares Listing: रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शेअरधारकांना मोठी बातमी दिली आहे. रिलायन्स समुहातील नवी कंपनी लवकरच शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. तारीखही जाहीर करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस 21 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात लिस्ट होईल. 

शेअर बाजारात गुंतवणूक करणारे अनेक दिवसांपासून जिओ फायनान्शियलचे शेअर्स लिस्ट होण्याची वाट पाहत होते. आता अखेर कंपनी लिस्ट होण्याची तारीख जाहीर झाली आहे. 21 ऑगस्टनंतर तुम्हीही इतर कंपन्यांच्या शेअर्सप्रमाणे Jio Financial चे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकाल. दरम्यान, आज रिलायन्सचे शेअर्स 0.51 टक्क्यांनी म्हणजेच 13.05 रुपयांच्या वाढीसह 2,551.05 च्या पातळीवर बंद झाले.

रिलायन्समध्ये गुंतवणूक असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बाब म्हणजे, ज्या गुंतवणूकदारांकडे रिलायन्सचे शेअर्स असतील, त्यांना प्रत्येक शेअरमागे जिओ फायनान्शियलचा 1 शेअर दिला जाईल. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स सध्या डमी टिकरखाली सूचीबद्ध आहेत. डमी टिकरवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 261.85 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
 

Web Title: Jio Financial Services Shares Listing: Good news for investors, shares of Jio Financial will be listed in the market on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.