Lokmat Money > बिझनेस न्यूज > अंबानी ग्रुपच्या 'या' शेअरने पकडला वेग; किंमत 400 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज...

अंबानी ग्रुपच्या 'या' शेअरने पकडला वेग; किंमत 400 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज...

Jio Fin Share At New High: मुकेश अंबानी यांच्या नवीन कंपनीच्या शेअर्सने कमालीचे वेग पकडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 07:46 PM2024-03-12T19:46:54+5:302024-03-12T19:47:31+5:30

Jio Fin Share At New High: मुकेश अंबानी यांच्या नवीन कंपनीच्या शेअर्सने कमालीचे वेग पकडला आहे.

Jio Financial Share New High: Ambani Group's share gains momentum; Estimated price to go up to Rs 400... | अंबानी ग्रुपच्या 'या' शेअरने पकडला वेग; किंमत 400 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज...

अंबानी ग्रुपच्या 'या' शेअरने पकडला वेग; किंमत 400 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज...

Jio Financial Share New High: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नवीन कंपनीच्या शेअर्सने कमालीचे वेग पकडला आहे. मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग दिवशी, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्सने सर्वकालीन उच्चांक गाठला. शेअर्स आणि मार्केट कॅपमध्ये झालेली वाढ पाहून तज्ज्ञांनी या शेअरसाठी नवीन टार्गेट प्राईस ठरवली आहे.

शेअर्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ
मंगळवारी शेअर बाजाराने संथ सुरुवात केली, परंतु जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स वेगाने धावत होते. JioFin शेअरने ट्रेडिंगदरम्यान सर्वकालीन उच्चांक गाठला आणि सुरुवातीच्या व्यापारात शेअर 5.27 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 374.50 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. मात्र, शेअर बाजारातील व्यवहार संपेपर्यंत हा वेग मंदावला आणि अखेर जिओफिनचा शेअर 2.18 टक्क्यांच्या वाढीसह 363.40 रुपयांवर बंद झाला.

शेअर 400 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो
जिओ फायनान्शिअलच्या शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीचे बाजार भांडवलही 2.31 लाख कोटी रुपये झाले. अंबानींच्या या शेअरची कामगिरी पाहून बाजारातील तज्ज्ञांनी ही तेजी कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख विनीत बोलिंजकर यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीलासांगितले की, जिओ फायनान्शिअल स्टॉकमधील वाढ कायम राहील. तर, जेएम फायनान्शिअलचे फंड मॅनेजर आशिष चतुरमोहता म्हणतात की, जिओ फिनचा स्टॉक 350 रुपयांच्या वर राहिला तर तो 400 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

(टीप- शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

Web Title: Jio Financial Share New High: Ambani Group's share gains momentum; Estimated price to go up to Rs 400...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.