नवी दिल्ली : २०१८ च्या दुसऱ्या सहामाहीत ४-जी उपलब्धतेच्या बाबतीत रिलायन्स जिओ देशात प्रथम क्रमांकावर राहिली. या काळात जिओची उपलब्धता सर्वाधिक ९८.८ टक्के राहिली.
डाटा गतिमापन (स्पीड टेस्ट) क्षेत्रातील कंपनी ‘उकला’ने जारी केलेल्या ‘भारतातील ४-जी उपलब्धतेचे विश्लेषण : १५ मोठ्या शहरांवरील दृष्टिक्षेपासह’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार, देशपातळीवर जिओने प्रभावी ९८.८ टक्के उपलब्धता दिली आहे. याचा अर्थ असा की, सर्वेक्षण करण्यात आलेल्या ठिकाणी जिओच्या ग्राहकांचा एलटीई सेवेसोबतचा संपर्क ९८.८ टक्के राहिला. ९० टक्के उपलब्धतेसह एअरटेल दुसºया स्थानी राहिली. व्होडाफोन (८४.६ टक्के) तिसºया आणि आयडिया (८२.८ टक्के) चौथ्या स्थानी राहिली. व्होडाफोन आणि आयडिया यांचे गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये विलीनीकरण झाले. तथापि, दोन्ही ब्रॅण्ड स्वतंत्रपणे कायम आहेत.
अहवालात म्हटले की, इंटरनेटच्या गतीच्या बाबतीत एअरटेल पहिल्या स्थानी राहिली. यात एलटीई सेवा असलेले आणि नसलेले, अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांची डाटा गती गृहीत धरण्यात आली आहे. एलटीई सेवेच्या गतीत व्होडाफोन दुसºया स्थानी, तर आयडिया चौथ्या स्थानी आहे. एअरटेलचे ४-जी एलटीई गतीचे गुण ११.२३, व्होडाफोनचे ९.१३, जिओचे ७.११ आणि आयडियाचे ७.०२ आहेत.
एलटीई सेवा हीच सर्वाधिक गतिमान
अहवालात म्हटले आहे की, ५-जी सेवा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत एलटीई सेवा हीच सर्वाधिक गतिमान सेवा राहील.
तथापि, भारतातील उदाहरणावरून हे दिसते की, ४-जी उपलब्धततेमुळे आपोआप गतिमान सेवा मिळते, असे नव्हे.
भारतातील गतिमान डाटा सेवा ठरविण्यासाठी आम्ही डाऊनलोड आणि अपलोड, अशा दोन्हींचे मापन केले. अनेक पातळ्यांवर
त्यांची कामगिरी तपासण्यात आली.
४-जी उपलब्धतेत जिओ प्रथम स्थानावर, एलटीई सेवा हीच सर्वाधिक गतिमान
२०१८ च्या दुसऱ्या सहामाहीत ४-जी उपलब्धतेच्या बाबतीत रिलायन्स जिओ देशात प्रथम क्रमांकावर राहिली. या काळात जिओची उपलब्धता सर्वाधिक ९८.८ टक्के राहिली.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:35 AM2019-02-13T00:35:27+5:302019-02-13T00:36:35+5:30