जिओने दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. दोन्ही प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो. यामध्ये डेटा व्यतिरिक्त यूजर्सना कॉलिंग, एसएमएस आणि इतर फायदे मिळतात. जिओने 30 दिवस आणि 90 दिवसांच्या वैधतेसह हे रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. जर तुम्ही जास्त इंटरनेट वापरत असाल तर तुम्ही हे पर्याय निवडू शकता.
कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 899 आणि 349 रुपयांचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स जोडले आहेत. दोन्ही प्लॅन्स समान फायद्यांसह येतात. अलीकडेच, Jio ने नववर्षाच्या निमित्ताने 2023 रुपयांचा नवीन प्लॅन आणि Jio न्यू इयर ऑफर लाँच केली होती. जाणून घेऊया Jio च्या प्लॅनबद्दल.
899 रुपयांचा प्लॅनआधीच नमूद केल्याप्रमाणे, या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा मिळतो. यामध्ये यूजर्सना 90 दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच, संपूर्ण वैधतेमध्ये, ग्राहकांना एकूण 225GB डेटा मिळेल. या रिचार्जमध्ये जिओ ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचाही लाभ मिळेल.
याशिवाय ग्राहकांना जिओ ॲप्सचे सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. ग्राहक जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउड आणि जिओ टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन वापरू शकतील. हा रिचार्ज प्लॅन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 5G सेवांचाही लाभ घेता येईल.
349 रुपयांचा प्लॅनजिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना 30 दिवसांची वैधता मिळते. याशिवाय, सर्व फायदे फक्त वरील योजनेप्रमाणेच आहेत. रिचार्जमध्ये ग्राहकांना एकूण 75GB डेटा मिळेल. ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS वापरू शकतील. यासोबतच युजर्सना जिओ ॲप्सचा मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय हा रिचार्ज प्लॅन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 5G सेवांचाही लाभ घेता येईल.