Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिओची धमाकेदार ऑफर! १०० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 'हे' फायदे मिळताहेत अनलिमिटेड

जिओची धमाकेदार ऑफर! १०० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 'हे' फायदे मिळताहेत अनलिमिटेड

jio recharge plan : जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची वैधता मिळत आहे. तर यात फोन कॉलिंग आणि मनोरंजन अमर्यादीत मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:53 IST2025-04-07T15:52:06+5:302025-04-07T15:53:19+5:30

jio recharge plan : जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची वैधता मिळत आहे. तर यात फोन कॉलिंग आणि मनोरंजन अमर्यादीत मिळत आहे.

jio recharge plan of rs 999 get 98 days validity with unlimited benefits | जिओची धमाकेदार ऑफर! १०० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 'हे' फायदे मिळताहेत अनलिमिटेड

जिओची धमाकेदार ऑफर! १०० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 'हे' फायदे मिळताहेत अनलिमिटेड

jio recharge plan : उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. जेव्हा जिओची बाजारात एन्ट्री झाली, तेव्हा कंपनीच्या वर्षभर फ्री ऑफर्सने खळबळ उडवून दिली होती. यामध्ये डझनभर कंपन्यांनी आपलं दुकान कायमचं बंद केलं. सध्या जिओकडे सर्वाधिक वापरकर्ते आहेत. आजही जिओचे रिचार्ज प्लॅन लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. जिओकडे सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी विविध प्रकारच्या ऑफर्स आहेत. जिओ पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आले आहे. यामध्ये सुमारे १०० दिवसांच्या वैधतेसह अनेक प्रकारच्या अमर्यादीत सेवा मिळत आहेत.

९८ दिवसांचा बंपर प्लॅन
जिओचा हा प्लॅन ९८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची वैधता मिळत आहे. फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित फायदे मिळणार आहेत. जिओचा हा प्लॅन तुम्ही ९९९ रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजे दिवसाला केवळ १०.१९ पैसे तुम्हाला द्यावे लागतील. 

ऑफरमध्ये काय फायदे मिळणार?
जिओचा ९९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ९८ दिवसांच्या वैधतेसह येतो. ९८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला ९८ दिवसांसाठी अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळेल. डेटाबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २GB डेटा दिला जाईल म्हणजेच तुम्हाला एकूण १९६ GB डेटाचा लाभ मिळेल. जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला ९० दिवसांसाठी Jio Hotstar आणि Jio TV च्या मोफत सबस्क्रिप्शनचा लाभ मिळणार आहे.

वाचा - 'या' ३ देशांमध्ये राहतात जगातील ५० टक्के श्रीमंत लोक! भारताचं नाव यादीत आहे की नाही?

३ महिने अलिमिटेड मनोरंजन
जिओच्या या प्लॅनचे सर्वात मोठं वैशिष्ट्ये म्हणजे यात तुम्हाला ९८ दिवस मर्यादीत मनोरंजन मिळणार आहे. कारण, जिओ तुम्हाला जिओ हॉटस्टार आणि जिओ टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहेत. सध्या आयपीएलचा जोरदार हंगाम सुरू असून तुम्ही घरबसल्या क्रिकेट सामन्यांचा आनंद घेऊ शकता. शिवाय कंटाळा आला तर चित्रपट, वेबसिरिज आणि मालिकांचा प्रचंड खजिनाही तुम्हाला यात मिळतो.

Web Title: jio recharge plan of rs 999 get 98 days validity with unlimited benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.