Join us  

Jio चा सर्वात 'स्वस्त' प्लॅन, एका वर्षासाठी मिळेल Disney + Hotstar, किंमत 500 रुपयांपेक्षा कमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 8:36 PM

Jio : हा जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे, जो Disney Plus Hotstar सह येतो.

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करतात. तुम्हाला लाँग टर्मपासून ते एक दिवसाच्या व्हॅलिडिटीपर्यंतचे प्लॅन्स मिळतील. स्वतःसाठी व्हॅल्यू फॉर  मनी प्लॅन शोधणे हे एक कठीण काम आहे. विशेषत: आता रिचार्ज प्लॅनमध्ये फक्त कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचे बेनिफिट्स मिळत नाहीत. उलट, या प्लॅन्समध्ये तुम्हाला इतर अनेक बेनिफिट्सही मिळतात.

आता ग्राहक प्लॅन खरेदी करण्यापूर्वी अतिरिक्त बेनिफिट्स देखील पाहतात. विशेषतः ओटीटी सबस्क्रिप्शनवर एक नजर नक्कीच टाकली जाते. इतर टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे जिओच्या पोर्टफोलिओमध्येही अनेक प्लॅन्स समावेश आहे. हा ब्रँड कमी बजेटपासून ते उच्च श्रेणीच्या योजनांपर्यंत अधिक फायद्यांसह ऑफर करतो. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये असे काही प्लॅन देखील आहेत, जे व्हॅल्यू फॉर मनी होऊ शकतात. मात्र, व्हॅल्यू फॉर मनी प्लॅन प्रत्येक युजर्ससाठी वेगवेगळे असू शकतात.

उदाहरणार्थ, जर युजर्सचा डेटा वापर कमी असेल, तर त्याच्यासाठी कमी डेटा असलेला प्लॅन अधिक चांगला असेल. याचबरोबर, एखाद्या युजरला अधिक डेटा असलेला प्लॅन हवा असतो. अशाच एक Disney + Hotstar Mobile सबस्क्रिप्शनसह येतो. यामध्ये तुम्हाला टेलिकॉम सर्व्हिसेसच्या तुलनेत Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते. 

जिओचा सर्वात स्वस्त  Disney Plus Hotstar प्लॅन हा जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे, जो Disney Plus Hotstar सह येतो. सर्वात स्वस्त प्लॅन 333 रुपयांचा असला तरी यामध्ये तुम्हाला डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन फक्त तीन महिन्यांसाठी मिळेल. 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना Disney + Hotstar Mobile चे एक वर्षासाठी सबस्क्रिप्शन मिळेल.

या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे, ज्यामध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा मिळेल. म्हणजेच या संपूर्ण प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 56GB डेटा मिळेल. याशिवाय, तुम्ही अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचाही लाभ घेऊ शकता. जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्श देखील उपलब्ध असेल. तुम्हाला Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन घ्यायचे असल्यास, हा तुमच्यासाठी सर्वात परवडणारा पर्याय आहे.

टॅग्स :जिओरिलायन्स जिओमोबाइल