नवी दिल्ली : रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे स्वस्त प्लॅनही महाग झाले आहेत. अशा परिस्थितीत अनेक युजर्स पोस्ट पेडकडे जात आहेत. तुम्हालाही तुमचा नंबर प्रीपेडवरून पोस्ट पेड करायचा असेल तर आम्ही तुम्हाला Jio पोस्ट पेडचा सर्वात स्वस्त प्लॅन सांगत आहोत. या प्लॅनमध्ये यूजर्सना जबरदस्त फायदे मिळतात. हा प्लॅन तुमच्या बजेटमधील आहे आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.
जिओचा 399 रुपयांचा Postpaid Planजिओच्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये युजरला जबरदस्त बेनिफिट्स मिळतील. जिओ पोस्टपेड प्लसचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजरला 75GB डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. तसेच, प्लॅनमध्ये अतिरिक्त फायदेही मिळतात.
Netflix मिळेल मोफतOTT प्लॅटफॉर्म भारतात खूप लोकप्रिय झाले आहेत. तुम्ही OTT प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनवर स्वतंत्रपणे पैसे खर्च करत असाल, तर त्याची गरज नाही, कारण या प्लॅनमध्ये Netflix आणि Amazon Prime सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहेत. या प्लॅनची वैधता एक महिन्याची असेल.
जिओचा 419 रुपयांचा प्रीपेड प्लॅनजिओच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, जिओकडे 399 रुपयांचा कोणताही प्लॅन नाही. पण 419 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. ज्यामध्ये यूजरला दररोज 3GB डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 84GB डेटा मिळेल. पण नेटफ्लिक्स किंवा अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन योजनेसोबत उपलब्ध नाही. तसेच, यामध्ये यूजरला जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळेल.