नवी दिल्ली : 1 डिसेंबरपासून जिओचे (Jio) प्लॅन महाग झाले आहेत. जिओच्या प्लॅनच्या किमती 21 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. १ डिसेंबरनंतर जिओने आपले अनेक प्लॅन अपडेट केले आहेत. अनेक प्लॅनमध्ये पूर्वी उपलब्ध असलेल्या सुविधा काढून टाकण्यात आल्या आहेत, तर अनेक प्लॅनमध्ये नवीन सुविधा दिल्या जात आहेत. सर्व प्लॅनसह Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar सारख्या OTT अॅप्सच्या मोफत सबस्क्रिप्शनची मागणी नेहमीच केली जाते. आता ग्राहकांची ही मागणी लक्षात घेऊन जिओने आपला एक स्वस्त प्लॅन पुन्हा आणला आहे.
499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन झाला रि-लाँच
जिओने आपला 499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन पुन्हा लाँच केला आहे. Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन या प्लॅनसह एक वर्षाच्या वैधतेसह उपलब्ध असेल. याशिवाय या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनसह नवीन ग्राहकांना जिओ प्राइम मेंबरशिप देखील मिळेल. या प्लॅनमध्ये Jio Cinema, Jio TV सारख्या अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.
Disney+ Hotstar ची सुविधा असलेले इतर प्लॅन
जिओकडे इतर अनेक योजना आहेत, ज्यात Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते. एक प्लॅन 601 रुपयांचा आहे. यामध्ये, 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3 जीबी डेटा दिला जातो. तसेच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनसह एक वर्षासाठी Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते.