संपूर्ण भारतात रिलायन्स जिओचा सर्व्हर डाऊन झाला होता. बुधवारी सकाळी यूजर्सनं आपल्याला इंटरनेट वापरण्यात समस्या येत असल्याची तक्रार केली होती. इंटरनेट सर्व्हिस ट्रॅकर डाउनडिटेक्टरवरही जिओ डाऊन असल्याचं दाखवण्यात आलं होतं. तर ट्विटरवरही अनेकांनी सेवा डाऊन असल्याची तक्रार केली. दरम्यान, अनेकांना इंटरनेट सेवा वापरण्यात मोठी ससम्या येत होती.
DownDetector च्या ग्राफनुसार, सकाळी ९.३० वाजल्यापासून जिओचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ग्राहकांना समस्या उद्भवत होत्या. त्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली. यानंतर अनेकांनी डाऊनडिटेक्टरवही तक्रारी केल्या होता. शिवाय ट्विटरवरही JioDown ट्रेंड करत होता.
एका युझरनं सकाळपासूनच आपली इंटरनेट सेवा सुरू नसल्याचं म्हटलं. तर आणखी एका युझरनं आपली जिओ फायबर सेवा सुरू नसून राऊटरमध्ये हिरव्या रंगाच्या लाईटऐवजी लाल रंगाचा लाईट दिसत असल्याची तक्रार केली. मोबाईलवर इंटरनेट सुरू आहे परंतु लॅपटॉप टीव्हीवर नेटवर्क नसल्याचं सांगत असल्याचीही तक्रार केली.
मोठ्या शहरांमध्ये ही समस्या असल्याचं दिसून आलं. दिल्ली एनसीआर, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकात्यासह अनेक शहरांमध्ये इंटरनेटची समस्या दिसून आली होती.