नवी दिल्ली : कोरोना संकट काळात वर्क फ्रॉम होममुळे बहुतेक लोक मोठ्या रिचार्ज प्लॅनचा शोध घेत आहेत. जास्त इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्स आणि अधिक व्हॅलिडिटी असलेला प्लॅन लोक रिचार्ज करू इच्छित आहेत. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या युजर्संना जवळपास 3 महिने (84 दिवस) व्हॅलिडिटी असलेला एक उत्कृष्ट प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रिचार्ज प्लॅनसह रिचार्ज करायचे असेल, जिओचे खालील प्लॅन सर्वोत्तम आहेत.
Jio चा 3GB दैनंदिन डेटा प्लॅन : जिओच्या 1,199 रुपयांचा 84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB नुसार एकूण 252GB इंटरनेट डेटा मिळेल. 1199 रुपयांच्या रिचार्जमध्ये 84 दिवसांमध्ये जास्तीत जास्त 252GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस सोबत, सर्व जिओचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.
719 रुपयांचा प्लॅन84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा ऑफर केला जात आहे. हा डेटा दररोज 2GB नुसार तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. या ऑफरमध्ये Jio-to-Jio अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. दररोज 100 मोफत एसएमएस देणाऱ्या या प्लॅनमध्ये जिओ अॅपचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.
666 रुपयांत मिळेल 126GB पर्यंत डेटाजिओच्या या 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या प्रीपेड प्लॅन अंतर्गत, तुम्हाला 1.5GB (1.5GB दैनिक डेटा) यानुसार दररोज एकूण 126GB पर्यंत डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड Jio-to-Jio दिले जात आहेत. यासोबतच, ग्राहकांना दररोज 100 मोफत एसएमएस देण्यात आले आहेत.