Jio Vs Airtel : गेल्या वर्षभरात सर्वच मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी आपल्या रिचार्जमध्ये मोठी वाढ केली आहे. पूर्वी महिन्याभराचा रिचार्ज १०० रुपयांत मिळत होता, आता त्यासाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत आहे. अशा स्थितीत योग्य कंपनीचा प्लॅन निवडणे गरजेचे आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. जिओचा टेलिकॉम क्षेत्रात दबदबा पाहायला मिळतो. या खेळात जुना खेळाडू एअरटेल कुठेही मागे नाही. देशातील कोट्यवधी युजर्स एअरटेलशी जोडलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला दोन्ही कंपन्यांच्या पोस्टपेड रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून पोस्टपेडच्या बाबतीत कोणती कंपनी अधिक चांगली ऑफर देत आहे हे तुम्हाला सहज कळू शकेल.
एअरटेल पोस्टपेड योजना
जर तुम्ही एअरटेल यूजर असाल आणि एअरटेलचा पोस्टपेड प्लान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लानबद्दल सांगणार आहोत. तुम्ही Airtel चा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान ४४९ मध्ये खरेदी करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्ण १ महिन्यासाठी ५०GB डेटा दिला जातो. अमर्यादित कॉलिंगसोबतच या प्लॅनमध्ये १०० मोफत एसएमएसची सुविधा देखील आहे. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्ही Airtel Extreme Play Premium चे फ्री सब्सक्रिप्शन देखील ॲक्सेस करू शकता. अशा परिस्थितीत ४४९ रुपयांचा हा पोस्टपेड प्लान तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
जिओ पोस्टपेड प्लॅन
तुम्ही Jio चा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान फक्त ३४९ मध्ये खरेदी करू शकता, म्हणजेच Airtel च्या प्लान पेक्षा १०० रुपये स्वस्त. या प्लॅनमध्ये तुम्हाला एका महिन्यासाठी ३०GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज १०० मोफत एसएमएस देखील समाविष्ट आहेत. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्ही Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud च्या मोफत सबस्क्रिप्शनचाही लाभ घेऊ शकता.