Join us

Jio देणार Airtel'ला टक्कर! 1000GB डेटा, मोफत OTT चॅनेल आणि टीव्ही ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 3:03 PM

Airtel ने Jio शी स्पर्धा करण्यासाठी दोन नवीन वायरलेस ब्रॉडबँड प्लॅन लाँच केले आहेत यात मोफत OTT, टीव्ही चॅनेल आणि इतर अनेक मोफत सेवांचाही समावेश आहे.

एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी दोन नवीन वायरलेस ब्रॉडबँड प्लॅन लाँच केले आहेत. हा 1000 GB डेट प्लॅन मोफत OTT, TV चॅनेलसह आहे. नवीन प्लॅन 699 रुपयांमध्ये आणि 999 रुपयांमध्ये आहेत.

नवीन 699 रुपयांच्या AirFiber एक मासिक योजना आहे. हा प्लान 1000GB डेटासह 40Mbps स्पीडसह येतो. या प्लानमध्ये यूजर्सना 350 लाईव्ह टीव्ही चॅनल आणि एअरटेल एक्सस्ट्रीमची सुविधा मिळते. याशिवाय, तुम्हाला Disney + Hotstar सदस्यत्वासह मोफत 4K Android TV सेट-टॉप बॉक्स मिळेल. हा प्लान एअरटेल ब्लॅक प्लानशी लिंक केला जाऊ शकतो.

आंध्र प्रदेशात सर्वात महाग, लक्षद्वीपमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल; जाणून घ्या इतर राज्यातील किमती

एअरटेलचा नवा प्लान 999 रुपयांचा आहे. हा महिन्याचा प्लॅन आहे.  यामध्ये यूजर्सला 1000GB हायस्पीड डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये 100Mbps स्पीड उपलब्ध आहे. तसेच, डेटा मर्यादा ओलांडल्यानंतर, अमर्यादित डेटा उपलब्ध होतो. पण त्याचा वेग कमी होतो. यासोबतच अँड्रॉईड टीव्ही बॉक्स आणि ३५० लाईव्ह टीव्ही चॅनल देण्यात येत आहेत. तसेच, Airtel Xstream आणि Disney + Hotstar चे सदस्यत्व दिले जात आहे. एअरटेल ब्लॅक प्लॅन या प्लॅनसोबत लिंक केला जाऊ शकतो.

यापूर्वी Airtel Xstream AirFiber फक्त 799 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. ही योजना 100Mbps स्पीडसह येते. यामध्ये 1000GB डेटा दिला जात आहे. तथापि, अतिरिक्त लाभ म्हणून कोणतेही OTT किंवा थेट टीव्ही चॅनेल दिले जात नव्हते. तथापि, आता Jio शी स्पर्धा करण्यासाठी, Airtel ने स्वस्त योजना लॉन्च केल्या आहेत आणि त्यांच्यासोबत OTT आणि इतर मोफत सेवा देत आहे.

टॅग्स :एअरटेल