Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिओ पुढच्या तीन वर्षात उत्तर प्रदेशात आणखी 10 हजार कोटी गुंतवणार - मुकेश अंबानी

जिओ पुढच्या तीन वर्षात उत्तर प्रदेशात आणखी 10 हजार कोटी गुंतवणार - मुकेश अंबानी

उत्तर प्रदेश पुढे गेल्याशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. आम्हाला उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवायचा आहे असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 11:52 AM2018-02-21T11:52:49+5:302018-02-21T11:57:42+5:30

उत्तर प्रदेश पुढे गेल्याशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. आम्हाला उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवायचा आहे असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी सांगितले.

Jio will invest another 10 thousand crore in Uttar Pradesh in next three years - Mukesh Ambani | जिओ पुढच्या तीन वर्षात उत्तर प्रदेशात आणखी 10 हजार कोटी गुंतवणार - मुकेश अंबानी

जिओ पुढच्या तीन वर्षात उत्तर प्रदेशात आणखी 10 हजार कोटी गुंतवणार - मुकेश अंबानी

Highlightsजिओने आतापर्यंत उत्तर प्रदेशात 20 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कमेची गुंतवणूक केली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या समिटमध्ये पाच हजार उद्योगपती सहभागी होणार आहेत.

लखनऊ - उत्तर प्रदेश पुढे गेल्याशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. आम्हाला उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवायचा आहे असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी सांगितले. ते यूपी इन्वेस्टर्स समिट 2018 मध्ये बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लखनऊच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये या समिटचे उदघाटन झाले. सुरुवातीला उद्योगपती मुकेश अंबानी यांचे भाषण झाले. 

उत्तर प्रदेशात मोठी गुंतवणूक करणाऱ्यांपैकी जिओ एक आहे. जिओने आतापर्यंत उत्तर प्रदेशात 20 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कमेची गुंतवणूक केली आहे. 2018 च्या अखेरपर्यंत उत्तर प्रदेशच्या प्रत्येक गावात जिओची सेवा सुरु झालेली असेल. पुढच्या तीन वर्षात उत्तर प्रदेशात जिओ आणखी 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे असे मुकेश अंबानी म्हणाले. 

दोन दिवस चालणाऱ्या या समिटमध्ये पाच हजार उद्योगपती सहभागी होणार आहेत. या समिटमुळे उत्तर प्रदेशात 20 लाख युवकांना रोजगार मिळेल असा दावा योगी सरकारने केला आहे. या समिटमध्ये 900 करारपत्रकांवर स्वाक्षऱ्या होतील असा अंदाज आहे. या समिटच्या माध्यमातून पाच लाख कोटीच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टय ठेवण्यात आले आहे.                                   


 

Web Title: Jio will invest another 10 thousand crore in Uttar Pradesh in next three years - Mukesh Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.