Join us

जिओ पुढच्या तीन वर्षात उत्तर प्रदेशात आणखी 10 हजार कोटी गुंतवणार - मुकेश अंबानी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 11:52 AM

उत्तर प्रदेश पुढे गेल्याशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. आम्हाला उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवायचा आहे असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी सांगितले.

ठळक मुद्देजिओने आतापर्यंत उत्तर प्रदेशात 20 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कमेची गुंतवणूक केली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या समिटमध्ये पाच हजार उद्योगपती सहभागी होणार आहेत.

लखनऊ - उत्तर प्रदेश पुढे गेल्याशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. आम्हाला उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवायचा आहे असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी सांगितले. ते यूपी इन्वेस्टर्स समिट 2018 मध्ये बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लखनऊच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये या समिटचे उदघाटन झाले. सुरुवातीला उद्योगपती मुकेश अंबानी यांचे भाषण झाले. 

उत्तर प्रदेशात मोठी गुंतवणूक करणाऱ्यांपैकी जिओ एक आहे. जिओने आतापर्यंत उत्तर प्रदेशात 20 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कमेची गुंतवणूक केली आहे. 2018 च्या अखेरपर्यंत उत्तर प्रदेशच्या प्रत्येक गावात जिओची सेवा सुरु झालेली असेल. पुढच्या तीन वर्षात उत्तर प्रदेशात जिओ आणखी 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे असे मुकेश अंबानी म्हणाले. 

दोन दिवस चालणाऱ्या या समिटमध्ये पाच हजार उद्योगपती सहभागी होणार आहेत. या समिटमुळे उत्तर प्रदेशात 20 लाख युवकांना रोजगार मिळेल असा दावा योगी सरकारने केला आहे. या समिटमध्ये 900 करारपत्रकांवर स्वाक्षऱ्या होतील असा अंदाज आहे. या समिटच्या माध्यमातून पाच लाख कोटीच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टय ठेवण्यात आले आहे.                                   

 

टॅग्स :मुकेश अंबानीउत्तर प्रदेश