मुंबई : जिओमार्ट आणि स्मार्ट सुपरस्टोअर यांनी १४ ते १८ ऑगस्ट यादरम्यान ‘फुल पैसा वसूल सेल’ या नावाने भारतातील सर्वांत मोठा आणि बहुप्रतीक्षित किराणा सामानाचा फेस्टिव्हल सेल आणला आहे. स्मार्ट सुपरस्टोअर, स्मार्ट पॉइंट आणि रिलायन्स फ्रेश यांच्या देशभरातील १,२०० स्टोअर्समध्ये हा सेल चालणार आहे. या सेलमध्ये मान्यवर ब्रँडची अन्नधान्ये, पाकिटबंद पदार्थ, गृह व वैयक्तिक देखभाल विषयक वस्तू, डेअरी उत्पादने आणि कपडे उपलब्ध असतील. या सर्वच वस्तूंवर आकर्षक सूट मिळेल. बिस्किटे, चॉकलेट आणि शाम्पू यावर ५० टक्क्यांपर्यंत, तर सॉफ्ट ड्रिंक्स्, टूथपेस्ट, नूडल्स आणि साबण यांवर ३३ टक्के सूट मिळेल. विविध डिटर्जंट रेंजवरील सूट ३० टक्के असेल. या स्टोअर्समध्ये बासमती तांदळापासून ते इतर धान्यांवर, किराणा वस्तूंवर आकर्षक सूट देण्यात आलीआहे. (वा.प्र.)
ॲपद्वारेही ऑर्डर- ग्राहकांना जिओमार्ट ॲपद्वारेही ऑर्डर नोंदविता येईल. त्याची ग्राहकांना मोफत घरपोच डिलिव्हरी मिळेल. मोफत डिलिव्हरी सेवेसाठी किमान खरेदीची कोणतीही अट नाही, हे विशेष. - फुल पैसा वसूल सेल आपल्या मनोरंजक जाहिरातींसाठी प्रसिद्ध आहे. यंदा सतीश शाह, केतकी दवे, शुभांगी अत्रे, मुकुल चड्डा, अश्लेषा ठाकूर आणि तनिष्क हे तारे-तारका सेलच्या जाहिरातीत झळकले आहेत.