Lokmat Money > बिझनेस न्यूज > JioPay बॉक्स होणार लाँच, Paytm चं टेन्शन वाढणार? पाहा काय असेल यात खास

JioPay बॉक्स होणार लाँच, Paytm चं टेन्शन वाढणार? पाहा काय असेल यात खास

रिलायन्स जिओ सातत्यानं निरनिराळ्या क्षेत्रात आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. येत्या काळात पेटीएमच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 12:12 PM2023-08-27T12:12:28+5:302023-08-27T12:13:02+5:30

रिलायन्स जिओ सातत्यानं निरनिराळ्या क्षेत्रात आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. येत्या काळात पेटीएमच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

JioPay box may be launched Paytm s tension will increase See what s special phone pe google pay upi payments | JioPay बॉक्स होणार लाँच, Paytm चं टेन्शन वाढणार? पाहा काय असेल यात खास

JioPay बॉक्स होणार लाँच, Paytm चं टेन्शन वाढणार? पाहा काय असेल यात खास

रिलायन्सजिओ सातत्यानं निरनिराळ्या क्षेत्रात आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. येत्या काळात पेटीएमच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण रिलायन्सजिओ पेटीएम सारखा स्वतःचा पॉकेट साइज स्पीकर आणण्याच्या तयारीत आहे. रिलायन्सकडून जिओ पे बॉक्स लाँच केला जाण्याची शक्यता आहे. लहान दुकानदार आणि व्यापाऱ्यांना तो उपलब्ध करून दिला जाईल. अशा परिस्थितीत पेटीएमच्या व्यवसायावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. जिओ पे बॉक्सनं पेटीएमची चिंता कशी वाढवली आहे ते पाहूया.

युपीआय (UPI) पेमेंटच्या बाबतीत पेटीएम भारतातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. पण त्याचा बाजारातील वाटा गुगल पे (Google Pay) आणि फोन पे (PhonePe) पेक्षा खूपच कमी आहे. फोन पे चा भारतात सर्वाधिक वापर केला जातो. एकूण युपीआय पेमेंटमध्ये त्यांचा वाटा ४६.४ टक्के आहे. तर गुगल पे ३४.८ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पेटीएम फक्त 14.7 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

का वाढणार चिंता?
छोटे दुकानदार आणि व्यावसायिक यांच्यातील व्यवहार पेटीएमद्वारे केले जातात, कारण पेटीएमद्वारे स्पीकर बॉक्स दिला जातो, जो त्यांना पेमेंटची माहिती देतो. मात्र, आता जिओ पे स्पीकर बॉक्स लॉन्च झाल्यानंतर पेटीएमच्या व्यवसायाला थेट स्पर्धा मिळणार आहे. तसंच, Jio Pay हे एकमेव अॅप आहे जे फीचर फोनवर वापरलं जाऊ शकतं.

ही माहिती मिळणार
जिओ पे बॉक्स अगदी पेटीएम बॉक्ससारखा असेल. यामध्ये पेमेंट केल्यानंतर ऑडिओद्वारे माहिती मिळणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, कंपनी या नवीन प्रोडक्टची आपल्या कर्मचाऱ्यांसोबत चाचणी करत आहे. त्यानंतर ते सर्वसामान्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून दिलं जाईल.

सबस्क्रिप्शन आणि अन्य माहिती
सध्या पेटीएमने लाखो पेटीएम बॉक्स बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. त्यांची मासिक फी १२९ रुपये आहे. या सबस्क्रिप्शन मॉडेलचा पेटीएमला खूप फायदा होतो. जिओ पे बॉक्स पेटीएमपेक्षा कमी किमतीत देऊ शकतो. तसंच, सुरुवातीला मोफत सबस्क्रिप्शनही दिलं जाऊ शकतं.

Web Title: JioPay box may be launched Paytm s tension will increase See what s special phone pe google pay upi payments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.